| | |

Stories of Diplomacy राजनयाच्या कथा

राजनयाची एक न्यारी दुनिया आहे. तिथले नियम वेगळे, तिथले कायदे कानून वेगळे. राजनैतिक अधिकारी जगभर आपापल्या देशाचे परराष्ट्र धोरण राबवण्याचे काम करतात, ते धोरण तयार करण्यासाठी उपयुक्त माहिती आपल्या देशाला पाठवत राहतात. लष्कर आणि गुप्तचरांचे त्यांच्याशी जवळचे संबंध असतात. विद्यापीठे आणि विविध थिंक टँक्स विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, ग्रंथालये, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, कलाकार, साहित्यिक, चित्रपट उद्योग, संगीत क्षेत्र, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ. भाषातज्ञ, धार्मिक नेते, सर्व क्षेत्रातील व्यापारी, उद्योजक अशा सर्वांशी त्यांचे उत्तम संबंध असतात. सर्व क्षेत्रातून जगभरातून माहिती गोळा करून तिचे विश्लेषण करून देशहीत अधिकातअधिक कसे साध्य करता येईल याकडे त्यांचे लक्ष असते.

अनेक भाषा येणे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू समजली जाते. ते कोणत्याही देशात गेले तरी ते राहात असतील त्या ठिकाणी त्यांच्या देशाचाच कायदा लागू होतो. राजदूतावर हल्ला करायचा नाही हा प्राचीन काळापासूनचा नियम आहे. युद्धस्य कथा रम्याः असे म्हणतात तसेच यांच्या पण कथा अद्भूत असतात. (ह्या अमेरिकन वेबसाईट्स पहा – https://diplomacy.state.gov/stories-of-diplomacy/ ; https://afsa.org/diplomacy-works-first-person-stories-field)

The four core principles of diplomacy, namely negotiation, communication, building relationships, and promoting interests, collectively form the foundation of effective diplomatic practices.

वाटाघाटी, संवाद आणि संसूचन – संपर्क, संंबंध प्रस्थापित करणे, आणि हीत साधणे ही राजनयाची महत्त्वाची कामे समजली जातात.

Many interesting stories about diplomacy highlight historical turning points, personal skill, and the human element in international relations. Key examples include Benjamin Franklin securing French support for American independenceLester Pearson resolving the Suez Crisis, and Otto von Bismarck’s skillful unification of Germany

शहाजी राजांच्या सुटकेचा किस्सा

  • कैदेचे कारण: शहाजीराजे आदिलशाहीचे सरदार होते आणि बंगळूरू प्रांतात जहागिरी सांभाळत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात आदिलशाही प्रदेशात स्वतंत्र राज्याच्या स्थापनेसाठी कारवाया सुरू केल्या होत्या. यामुळे आदिलशहाने संतापून शहाजीराजांना जबाबदार धरले आणि मुस्तफाखान या सरदाराच्या मदतीने त्यांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. शहाजीराजांना तीन वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले होते.
  • शिवाजी महाराजांची चाल: शहाजीराजांच्या अटकेची बातमी जेव्हा महाराष्ट्रात जिजाऊ आणि शिवाजी महाराजांना समजली, तेव्हा स्वराज्यावर आणि शहाजीराजांच्या प्राणावर मोठे संकट ओढवले. यावेळी शिवाजी महाराजांनी आदिलशाहीविरुद्ध थेट युद्ध पुकारले नाही, कारण त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकली असती.
  • मुत्सद्देगिरीचा वापर:
    1. शिवाजी महाराजांनी आदिलशहावर राजकीय दबाव आणण्याचे ठरवले.
    2. त्यांनी आदिलशहाचा कट्टर शत्रू असलेल्या मोगल साम्राज्याकडे मदतीचा हात पुढे केला.
    3. त्याकाळी दक्षिणेचा मोगल सुभेदार म्हणून शाहजहानचा मुलगा मुरादबक्ष  औरंगाबाद येथे कारभार पाहत होता.
    4. शिवाजी महाराजांनी मुरादबक्षाशी संपर्क साधला आणि त्याला कोंडाणा किल्ला (सिंहगड) देण्याचे आश्वासन दिले. तसेच शहाजीराजांची सुटका झाल्यास मोगलांच्या वतीने आदिलशाहीविरुद्ध लढण्याचे कबूल केले.
  • परिणाम: मोगलांनी या संधीचा फायदा घेतला आणि आदिलशहावर शहाजीराजांना सोडण्यासाठी दबाव आणला. दोन्ही बलाढ्य सत्तांचा (मोगल आणि मराठा) वाढता दबाव आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील काही किल्ले देण्याची तयारी दर्शवल्यामुळे, आदिलशहाला शहाजीराजांना सोडावे लागले. २६ मे १६५८ रोजी शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्यात आली.

या घटनेत, शिवाजी महाराजांनी थेट युद्धाचा मार्ग न स्वीकारता, शत्रूच्या शत्रूला आपलेसे करून अत्यंत हुशारीने आणि मुत्सद्देगिरीने आपल्या वडिलांची सुटका केली.

युक्रेन-रशिया युद्धाच्या दरम्यान युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची सुटका – ऑपरेशन गंगा

युक्रेन-रशिया युद्धाच्या दरम्यान फेब्रुवारी २०२२ युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने – परराष्ट्र खात्याने विशेष प्रयत्न केले – त्याची ही बातमी वाचा – https://www.opindia.com/2022/02/operation-ganga-indian-government-rescues-stranded-indians-ukraine-russia-war/

Loading

Similar Posts