प्रवास लोकलचा…

प्रवास लोकलचा…

खिडकी जवळचे सीट
दोन सीट च्या मधली उभे राहण्याची जागा
फॅन खालचे सीट
दरवाज्यात उभे राहून हवा खाणे
सामान वर ठेवणारा स्वयंसेवक
गरजूना जागा देणारे दयाळू
कुठे उतरायचे ते सांगणारे गाईड
स्पेशल डब्बा आहे याची जाणीव असणारे आणि करून देणारे

चौथे सीट
मसाज घेत उभे राहण्याची धडपड
हाडे मोडतील ही भीती
मोबाईल, पाकीट मारले जाईल ही भीती
फाटलेले पत्रे आणि बॉम्बची भीती
धक्का-बुक्की, घाम, वास
दारूचा वास आणि धुंदी
गाडीतून पडून मरण्याची भीती
लाटेसारखा येणारा आणि जाणारा गर्दीचा दबाव
दुसऱ्याच्या पायात घातलेला पाय, घवले वळणे
खेटणे, दाबणे, बलात्कार, लाल-पांंढरी थुंकी, रक्त, शु, शी आणि उलटी

ढोलकी, टाळ आणि पत्ते
कोपरापासून तुटलेला की कापलेला हात
गुडघ्यापासून तुटलेला की कापलेला पाय
घुंगरू, डफ आणि नाच
शेम्बडी गोड बाळे आणि त्यांच्या अस्थीपंजर आया
मोबाइल गेम्स, डाउनलोड केलेल्या फिल्म्स, सिरिअल्स

भिकारी, व्यापारी, मवाली, गर्दुल्ले
बहुभाषिक शिव्या आणि भांडणे
चणे, शेंगा, आलेपाक, गोळ्या
चित्रांची पुस्तके, टाचण्या, पिना आणि रबर
खास कंपनीने स्वस्तात दिलेले

तीन सीटांवर निश्चिंत झोपलेली माणसे
दरवाजात मांडी ठोकून बसणारी माणसे
स्थितप्रज्ञ गार्ड आणि ड्रायव्हर
टपावरची माणसे
आणि चाकाखालचीही माणसे
प्रेत आणि नवजात

सुख आणि दुःख
माझे आणि तुझे
मान आणि अपमान
अभिमान आणि दुराभिमान
चांगले आणि वाईट
स्वच्छ आणि घाण

आणि आपले स्टेशन आले की…
एका क्षणात
सगळा खेळ खल्लास…
अगदी थेट आयुष्यासारखा

शुभराज बुवा

31 October 2018

21:53

Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivatives 4.0 International License.

Similar Posts

  • Indian Constitution

    भारतीय राज्यघटनेच्या निर्मीतीचा इतिहास Latest version of the Indian constitution Link to lecture on State and types of constitution – राज्य आणि राज्यघटनांचे प्रकार India Code – digital repository of all central and state acts . Interesting book. राज्यशास्त्र – एक समाजशास्त्रशास्त्र – शास्त्रीय पद्धतीने अभ्यासरसायनशास्त्र – Chemistryजीवशास्त्र – Biologyपदार्थविज्ञान शास्त्र – Physicsही सर्व नैसर्गीक…

  • भारतीय साम्यवादी पक्ष

    १९२५ मध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. १९६४ मध्ये पक्षामध्ये पहिली फूट पडली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली.

  • Indian Constitution – features, preamble, FRs

    भारतीय संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये संविधान, राज्यघटना, घटना हे समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात.  कोणत्याही देशाचे संविधान म्हणजे त्या देशाचा मूलभूत कायदा.  त्या आधारावर आणि त्या चौकटीतच इतर कायदे केले जातात.  आज संपूर्ण जगात दोनशेच्या आसपास सार्वभौम देश आहेत.   प्रत्येक देशाची स्वतंत्र घटना असते. लिखित राज्यघटना  घटनांचे अनेक प्रकार असतात विविध प्रकारे त्यांचे वर्गीकरण करता…

  • न्यायालयीन सक्रियता – Judicial activism

    न्यायालयीन सक्रियता शासनाचे तीन प्रमुख भाग मानले जातात.  कार्यकारीमंडळ, कायदेमंडळ आणि न्यायमंडळ.  कार्याच्या आधारावर हे विभाजन करण्यात आले आहे.  कायदेमंडळ कायदे करते, कार्यकारीमंडळ त्या कायद्यांची अंमलबजावणी करते आणि न्यायमंडळ त्या कायद्यांचा अर्थ लावते.  न्यायमंडळ कायद्यांचा अर्थ लावते – म्हणजेच कायद्याच्या अर्थासंबंधी केंद्रसरकार, राज्यसरकार, नागरिक, देशी किंवा आंतरराष्ट्रीय आणि खाजगी किंवा सरकारी संस्था यांच्यामध्ये कोणत्याही कारणाने…

  • Naxalism – नक्षलवाद

    माओच्या Power through bullet, and not ballot या तत्त्वावर विश्वास असणारे अतिरेकी. नक्षलबारी विभागात यांच्या कार्याला सुरवात झाली त्यावरून नक्षलवादी हे नाव पुढे रूढ झाले. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचा नक्षल व्यवस्थापन विभाग होता. जून 2014 मध्ये सध्याच्या मोदी सरकारने या विभागाचे नामांतर Left Wing Extremism Division – डावे अतिरेकी विभाग असे केले. नव्या विभागाच्या वेबसाईटवरील माहिती…