Online meeting about the fourth year under NEP 2020

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
आयोजित
ऑनलाईन चर्चासत्र
दि. १६ एप्रिल २०२६ सायं. ०६.०० वा.

विषय: दि. ०६ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयानुसार शै. वर्ष २०२६-२७ पासून चार वर्षाचा ऑनर्स आणि संशोधनासह चार वर्षाच्या ऑनर्स अभ्यासक्रमाची अंमलबजावणी

उपरोक्त विषय अन्वये महाराष्ट्र राज्यातील राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्नित /स्वायत्त वरिष्ठ महाविद्यालये/उच्च शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य/संचालक यांचेकरीता दि. १६ एप्रिल २०१६ रोजी दु. ०६.०० वा. प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, मा. कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, मुंबई तथा सदस्य राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राज्य सुकाणू समिती, यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपल्या विभागातील/ विद्यापीठ परिक्षेत्रातील संलग्नित/स्वायत्त वरिष्ठ महाविद्यालये/उच्च शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य/संचालक यांना सदर चर्चासत्रात सहभागी होण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. सहभागी होणाऱ्या प्राचार्य/ संचालक यांना सदर विषयाबाबत काही प्रश्न सत्रादरम्यान उपस्थित करायचे असतील तर निवडक प्राचार्य यांचे प्रश्न संचालनालयास चर्चासत्र सुरु होण्यापूर्वी दि. १६ एप्रिल २०२६ रोजी दु. ०१.०० वा. पर्यंत WhatsApp द्वारे कळवावेत.

चर्चासत्राचे उदघाटक व अध्यक्ष
श्री. चंद्रकांत (दादा) पाटील
मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य

प्रमुख मार्गदर्शक
प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी
मा. कुलगुरू, मुंबई विद्यापीठ, मुंबई तथा सदस्य राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राज्य सुकाणू समिती

प्रमुख उपस्थिती
श्री. वेणुगोपाल रेड्डी भा. प्र. से.
मा. अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन

सहभाग
महाराष्ट्र राज्यातील राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्नित /स्वायत्त वरिष्ठ महाविद्यालये/उच्च शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य/संचालक

निमंत्रक
प्रा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर
संचालक (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे

Similar Posts