जॉन रॉल्स

डॉ. संज्योत आपटे यांचे व्याख्यान आणि त्याचा सारांश

१७ जुलै – आंतरराष्ट्रीय न्याय दिवस

International Justice Day (IJD) commemorates the historic adoption of the Rome Statute on 17 July 1998. It marks the importance of continuing the fight against impunity and bringing justice for the victims of war crimes, crimes against humanity, and genocide.

What is the Rome Statute of the International Criminal Court?

It is the statute that established the International Criminal Court in Hague, the Netherlands.

Awards and honours received by John Rawls[edit]

Bronze Star for radio work behind enemy lines in World War II.[41]

Schock Prize for Logic and Philosophy (1999)

National Humanities Medal (1999)

Asteroid 16561 Rawls is named in his honor.

न्यायाची संकल्पना

प्लेटो पासून चर्चा – प्लेटोची संकल्पना – head, heart, stomach, educational system, ban on private property and marriage for the ruling class – the soldiers and rulers, producers may have it – because these two are the most corrupting influences – property and family – Philosopher King.

No serious discussion of this concept later.  After Marx the tradition of theory interrupted.

John Rawls – महान राजकीय तत्त्वज्ञ, २० व्या शतकातील सर्वात महत्त्वाचे विचारवंत

Theory of Justice – 1971 – but started with an article in 1957, then in 1963 and 1967 शोधनिबंध – Latest edition in 1999 – अनेक भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले.  या पुस्तकावर प्रचंड टीकाही झाली.  So almost 40 years of discussion of a concept.  

Other books by Rawls

1985 – Justice as Fairness: Political, not metaphysical (article)

1993 – Political Liberalism

1999 – The Laws of Peoples

1999 – Collected Papers

1999 – Revised edition of Theory of Justice

2001 – Justice as Fairness – A restatement

रॉल्सने वादविवादाची सॉक्रेटीस आणि प्लेटोची परंपरा चालवलेली दिसते. – Socratic enterprise of continued debate

Rawls discussed the concept in the framework of moral philosophy, political science, ethics, political economy – seminal work  Rawls died in 2002 – American thinker.  

रॉल्सच्या विचारांची पार्श्वभूमी

रॉल्स स्वतः दुसऱ्या महायुद्धादरम्यान सैनिक, जपानमधील अनुभव – atom bomb.

Holocaust – ज्यूंचे हत्याकांड – Fascism, Nazism – म्हणूनच – least advantaged, वंचित, शोषित हे शब्द त्यांच्या लिखाणात सारखे डोकावतात.

दुसऱ्या महायुद्धाचा अंत

अमेरिकेचा महासत्ता म्हणून उदय

शीतयुद्ध

विचारप्रणालीचा अंत – Daniel Bell

औद्योगिकरणानंतरचा समाज – post industrial society

व्हिएटनाम युद्धाला होणारा विरोध

अमेरिकेतील संपन्नता – ही संपन्नता फसवी आहे – असमानतेवर आधारित आहे याची रॉल्सना जाणीव होती.

रॉल्सना पडलेला प्रश्न – अमेरिकेतील संपन्नता खरी आहे का ? ती सगळ्यांपर्यंत पोचली आहे का ? 

पाश्चिमात्य राजकीय संस्था कुठल्या विचारप्रणालीच्या आधारावर चाललेल्या आहेत?  – सध्या त्या उपयुक्ततावादाच्या आधारावर चाललेल्या आहेत.  पण त्यामुळे वंचितांना न्याय मिळालेला नाही, त्यामुळे उपयुक्ततावादाचे खंडन आपल्याला करावे लागेल.  उपयुक्ततावादाला पर्याय मांडावा लागेल आणि त्यानंतरच न्यायाच्या संकल्पनेला एक भक्कम आधार देता येईल.  

समाजात दुष्ट प्रवृत्ती का आहे?

अशा परिस्थितीत मानवी अस्तित्व शक्य आहे का?

न्यायाधिष्ठीत समाज शक्य आहे का ?

मानवी वृत्ती ही नैसर्गीकदृष्ट्या अनैतिक, भ्रष्ट नाही.  माणसाचा मूळ स्वभाव समाजशील आहे व न्यायासाठी तो स्वतःवर प्रयत्नपूर्वक निर्बंध घालण्यास सक्षम आहे, म्हणूनच न्याय हे मानवी स्वभावाशी सुसंगत मूल्य आहे.

Justice should be the foundation of any good society or political system.

रॉल्सना उपयुक्ततावादाल पर्याय द्यायचा होता.  उपयुक्ततावाद ही जेरेमी बेंथॅम आणि जेम्स मील यांनी मांडलेली विचारप्रणाली.  जॉन स्टुअर्ट मीलने त्यामध्ये काही सुधारणा सुचवल्या.  १९५० आणि ६० च्या दशकातील हा प्रबळ राजकीय सिद्धांत होता – सर्वाधिक लोकांचे सर्वाधिक सुख – The greatest happiness of the greatest number – सर्व लोकांचे एकूण/सरासरी हित जास्तीजास्त वाढवणे – Maximise the overall/average well being of all people.

परंतु सरासरी हित वाढवण्याच्या प्रयत्नात वंचितांच्या हिताकडे दुर्लक्ष होऊ शकते शिवाय सुखाची – आनंदाची व्याख्या आणि त्यातील गुणात्मक फरक या विषयीचा प्रश्न होताच.  अर्थात हा प्रश्न जॉन स्टुअर्ट मीलने पण मांडला होता.

१७ व्या शतकानंतर युरोपात लॉकने मांडलेला उदारमतवाद सगळीकडे स्वीकारलेला विचार होता – accepted ideology.  Liberalism is an individualistic ideology.  It is all about me – my rights, my liberties 

Theory of Justice was presented as an alternative to Utilitarianism.

रॉल्सवर जॉन लॉक, रुसो आणि इम्यान्युअल कांट या विचारवंतांचा प्रभाव.  जॉन लॉककडून त्यांनी उदारमतवाद, नैसर्गीक हक्कांचा सिद्धांत, स्वातंत्र्याचा आग्रह, लोकशाही, मर्यादीत शासन ह्या गोष्टी घेतल्या.

लॉक आणि रुसोकडून रॉल्स सामाजिक कराराची संकल्पना घेतात.  सामाजिक कराराची चौकट त्यांना उपयुक्त वाटते कारण सामाजिक करारामध्ये मांडला जाणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सदसदविवेक बुद्धी असलेली व्यक्ती ही स्वेच्छेने करार करत आहे.  रॉल्स हे पूर्णपणे लोकशाहीवादी आहेत.  त्यामुळे त्यांचा हा विचार स्पष्ट आहे की लोकांमध्ये न्यायाबद्दल एकवाक्यता स्वेच्छेने यायला हवी.  न्यायावर आधारित नव्या राज्याची निर्मीती स्वेच्छेने असली पाहिजे.

रुसोचा माणसाच्या चांगुलपणावर विश्वास होता.  रॉल्सना हा त्याचा विचार पटलेला दिसतो.  तसेच रुसोचा सामुहिक ईहेचा – सगळ्यांनी मिळून सर्वांच्या हीतासाठी कार्य करणे –  विचारही त्यांनी स्विकारलेला दिसतो.

रॉल्सवर कांटचा सर्वात जास्त प्रभाव.  कांट हे जर्मन आदर्शवादी विचारवंत.  कांटचा व्यक्तीप्रतिष्ठेचा मुद्दा रॉल्सना महत्त्वाचा वाटतो.  रॉल्स dignity of the individual याला खूप महत्त्व देतात.  प्रत्येक व्यक्तीची एक प्रतिष्ठा आहे आणि समाजात त्याला आदर मिळालाच पाहिजे.

व्यक्तीला हक्कासारखीच कर्तव्यांचीही जाणीव असली पाहिजे.  नवी व्यवस्था उभी केल्यानंतर कायद्यांचे पालन करण्याची जबाबदारी शेवटी नागरिकांवरच असणार आहे.  नैतिक तत्त्वज्ञानाचा हा मुद्दा हा रॉल्सवरील कांटचा प्रभाव दर्शवतो.  

रॉल्सच्या मते न्याय म्हणजे रास्तपणा – Justice as Fairness 

इथे न्यायाला उदारमतवादाची चौकट आहे.  

लोकशाही महत्त्वाची

सर्वांना समान राजकीय हक्क असतील – आपले मत व्यक्त करणे, संघटन, सरकारला विरोध हे अधिकार नागरिकांना असतील.

हे हल्ली जगभार कमी होताना दिसते आहे – सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना हरतऱ्हेने संपवण्याचे प्रकार सुरु आहेत.  त्यामुळे हे विचार अंमलात आणणे कठीण होत चालले आहे.

शिक्षणाची आणि व्यवसायाची समान संधी मिळणार आहे – यासाठी सरकारला विशेष प्रयत्न करावे लागतील, मोठी गुंतवणुक करावी लागेल.  त्यासाठी पैसा हवा – तो करांमधून मिळतो आणि मोठ्या प्रमाणावर कर समाजातील श्रीमंत वर्गाकडून येतो.  तो त्यांच्याकडचा पैसा गरिबांकडे वळवला पाहिजे – वळवणे हे हुकूमशाहीत किंवा साम्यवादात सहज शक्य आहे परंतु लोकशाही व्यवस्थेत ते कसे साध्य करणार?

मुक्त बाजारपेठ असेल.

व्यक्तीच्या व्यवसाय स्वातंत्र्याचा सन्मान

वंचित घटकांना किमान सामाजिक लाभ/सेवा प्रदान करणे

रॉल्स यांचे प्रारूप (model)

रॉल्स सामाजिक कराराची परंपरा मान्य करतात.  त्यांचे प्रारूप त्यावर आधारित आहे.  त्यांनी लॉक, रुसो, कांट यांची लोकशाही आणि उदारमतवादावर आधारित सामाजिक करार परंपरा पुढे विकसित केली आहे.    

Original position – मूलभूत स्थिती 

सामाजिक कराराच्या सिद्धांतामध्ये निसर्गावस्थेचा उल्लेख आहे.  तो starting point आहे.  त्याऐवजी रॉल्स original position इथून सुरवात करतात – हे सगळे काल्पनिक (hypothetical – गृहीत धरणे, गृहीतक) आहे.  Theory building – सिद्धांत मांडणीसाठी काही गृहीतकांची गरज असते, त्यापैकीच हे एक.  

मूलभूतस्थितीम्हणजेकाय?  

न्याय्य समाज निर्मीतीसाठी आपल्याला एका विशिष्ट स्थितीपासून सुरवात करावी लागेल.  या परिस्थितीत स्वातंत्र्य, समानता आणि नैतिक बाबी सर्व लोकांसाठी समान असतील.  ही काल्पनिक अवस्था आहे.  न्यायाच्या विचारांना आधार देण्यासाठी हा प्रयोग आहे.  लोक आपले प्रतिनिधी निवडतील.  ते प्रतिनिधी न्यायाची तत्त्वे मांडतील आणि राज्यव्यवस्थेची रचना करतील.  

मूलभूत स्थितीची तीन वैशिष्ट्ये आहेतः- 

लोक विवेकी असतात – योग्य अयोग्य यामधील फरक त्यांना करता येतो.  Man is a rational being.

लोक विचारी आहेत – त्यांना आयुष्यात काय साध्य करायचे आहे याची कल्पना आहे.  People are prudent – व्यवहारी, वास्तववादी 

लोक परस्परांपासून अलिप्त आहेत – करारातील पक्ष म्हणून ते एकमेकांपासून तटस्थ आहेत त्यांच्यामध्ये प्रेम किंवा मत्सर अशी कोणतीही भावना नाही.  तुमचे विचार तुमच्यापाशी, माझे माझ्यापाशी हे प्रत्येकाचे धोरण आहे.   People are indifferent.

अज्ञानाचापडदा – Veil of ignorance

आपण कोण आहोत हे सगळेच विसरलेले आहेत.  आणि तशा स्थितीत ते सामाजिक करार करणार आहेत.  सहसा करार करणाऱ्या दोन व्यक्तींना किंवा पक्षांना एकमेकांबद्दल पूर्ण माहिती असते – उदा. धर्म, जात, आर्थिक-शैक्षणिक स्थिती, पत अशा सर्व बाबींची सांगोपांग माहिती असते.  करार करताना काही गोष्टी आधीच ठरलेल्या असतात.  मी तुमच्याशी व्यवहार करणार की नाही हे अगोदर ठरलेले नाही.  करार करताना माझा जास्ती जास्त फायदा कसा होईल हे मी पाहणार तसेच समोरच्या पक्षाचाही तोच दृष्टोकोन असणार.  

प्रत्येजण आपल्या अस्मिता आपल्या बरोबर carry करत असतो – धर्म, जात, वंश, लिंग अशा सर्व.  समाजात वावरत असताना त्या अस्मितांचे आपण भांडवल करतो.  काही लोकांना जवळ करतो तर काहींना दूर ठेवतो.  

आपले आमदार-खासदार किंवा धोरण ठरवणारे अस्मितांच्या आधारे व्यवहार करतात, धोरण आखतात.  त्यामुळे धोरण आखणीमध्ये सुद्धा १०० टक्के सगळ्यांचा विचार होईल असे नाही.  

रॉल्स हे सगळ जाणतात, कारण अमेरिकेतही हीच स्थिती आहे.  अमेरिकेतील welfare capitalism ते नाकारतात, आणि त्यांचा पर्याय वेगळा आहे हे ठामपणे मांडतात. अमेरिकेतील प्रचलित व्यवस्था न्यायाला धरून नाही.  तिथे lobbying चालते.  धोरण आखणारे आपले स्वार्थ पुढे करत आहेत.  अशा स्थितीत आहेरे वर्गाचे जास्त भले होत असते आणि नाहीरे वर्ग मागे पडत जातात.  

गृहीत धरलेल्या मूलभूत अवस्थेमध्ये तशी स्थिती नाही कारण कोणालाच कोणाबद्दलही आणि अगदी आपल्या बद्दलही काही माहिती नाही.  सगळ्यांनी अज्ञानाचा पडदा डोळ्यापुढे ओढून घेतला आहे.  त्यामुळे मूलभूत स्थितीमध्ये न्यायाच्या तत्त्वांची निःपक्षपाती निवड करायची असेल तर प्रत्येकाने आपली भूमिका विसरणे गरजेचे आहे, अस्मिचा सोडून देणे गरजेचे आहे – म्हणजेच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक अज्ञानाचा पडदा असेल.  मी पुरुष आहे की स्त्री हेसुद्धा मला माहित नाही.  मी गरीब आहे की श्रीमंत मला माहित नाही.  कृष्णवर्णीय आहे की गोरा हे माहिती नाही.  मला माझ्याबद्दल कुठलीच गोष्ट माहिती नाही.  यालाच अज्ञानाचा पडदा म्हणतात.  सर्वांनी समानतेच्या तत्त्वावर एकत्र यावे यासाठी हा अज्ञानाचा पडदा तयार करण्यात आला आहे.  

जेव्हा अशा अवस्थेत न्यायाची तत्त्वे ठरवली जातील त्यावेळी प्रत्येक जण हाच विचार करेल की जेव्हा अज्ञानाचा पडदा दूर होईल तेव्हा मी गरीबातला गरीब निघालो तरी ती तत्त्वे माझ्यासाठी न्याय्य ठरतील.  याचा सरळ साधा अर्थ असा की न्याय प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत असणारी माणसे जोपर्यंत पूर्णपणे निःपक्षपाती असणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने न्याय प्रस्थापित करणे अत्यंत अवघड आहे.  अज्ञानाचा पडदा गरजेचा आहे कारण आपण अस्मितांच्या सह न्यायाची तत्त्वे ठरवण्यासाठी बसलो तर खरा न्याय होईल याची खात्री नाही.

न्यायाची दोन तत्त्वे – Two principles of justice

एकदा अशा निःपक्षपाती स्थितीमध्ये गेल्यानंतर माणसे न्यायाच्या दोन तत्त्वांची निवड करतील.  

पहिलेतत्त्वप्रत्येकव्यक्तीलाअधिकतममूलभूतस्वातंत्र्यमिळण्याचामूलभूतहक्कआहे.  All people will have all basic freedoms.  अर्थात स्वातंत्र्याची ही संकल्पना इतरांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेशी सुसंगत असणार आहे.  म्हणजे दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी असणार नाही.  

  1. विचारांचेस्वातंत्र्यविवेकाचेस्वातंत्र्य – रेनेसाँस मधील महत्त्वाची संकल्पना – I think and therefore I am.  माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे प्रत्येक माणसाला हे मिळायला हवे.  कोणताही धर्म स्वीकारा किंवा कुठलाही धर्म स्वीकारू नका.  प्रत्येकाला जे वाटते ते विविध मार्गांनी व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य.  हा खूप मोठा अधिकार आहे.  प्रत्यक्ष उदाहरणे बघितली तरच याचा अर्थ लक्षात येईल.  
  2. संघटनास्वातंत्र्य– Freedom of association – समविचारी व्यक्तींबरोबर एकत्र येऊन काही विचारांची देवाण-घेवाण करणे, प्रश्न विचारणे-उपस्थित करणे शक्य असेल.  त्यामुळे मी माणूस म्हणून अजून चांगल्या पद्धतीने घडू शकेन.
  3. राजकीयस्वातंत्र्य-मतादानाचा हक्क, राजकीय प्रक्रियांमध्ये सहभागी होण्याचे स्वातंत्र्य
  4. वैयक्तिकस्वातंत्र्य– As a person I should get the freedom to grow – व्यक्ती म्हणून स्वतःचा विकास करण्याचे स्वातंत्र्य
  5. व्यवसायस्वातंत्र्य– मला हवा तो व्यवसाय, हवे ते करियर करण्याचे स्वातंत्र्य
  6. कायद्याचेराज्यमनमानीअटकेपासूनस्वातंत्र्य– Rule of Law – freedom from arbitrary arrest.  मी भीतीखाली राहीलो तर समाजात माझा वावर पूर्णपणे माझ्या मनुष्यत्वाला धरून होणार नाही.  माझे व्यक्तीमत्व विकसित करायला मला वाव मिळणार नाही.  कायद्याच्या राज्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची भीती नसावी.

यापैकी कोणतेही स्वातंत्र्य अनिर्बंध नाही.  स्वातंत्र्य हे केवळ स्वातंत्र्याच्या फायद्यासाठी प्रतिबंधीत केले जाऊ शकते.       आपल्या राज्यघटनेतही अशाच प्रकारची रचना आहे.  उदा. मोठ्या शहरांमध्ये काही मुले रात्री दोन वाजता मोठा आवाज करत मोटारसायकल चालवत असतात.  ते असा दावा करतील की त्यांना स्वातंत्र्य आहे.  पण इतर सामान्य माणसे असे म्हणू शकतात की रात्री शांतपणे झोपण्याचे आमचे स्वातंत्र्य तुमच्या वागण्यामुळे बाधीत होत आहे, त्यावर गदा येते आहे.  त्यामुळे मोटारसायकल स्वारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणावी लागली तरी ते रास्त असणार आहे.  कारण इतर बहुसंख्य लोकांच्या स्वातंत्र्याला ते फायदेशीर होणार आहे. 

दुसरेतत्त्वविषमतेचेतत्त्व – Difference principle

सामाजिकआणिआर्थिकविषमतांचीव्यवस्थाकेलीपाहिजे

या विषमतेमुळे समाजातील उपेक्षित स्तरावरील लोकांचा फायदा झाला पाहिजे.  तर त्याप्रकारची विषमता स्वीकारली जाईल अन्यथा नाही.  श्रीमंत आणि गरीबांमध्ये प्रचंड दरी आहे – हे अजिबात योग्य नाही.  ते कमी करण्यासाठी सरकारने काही धोरणे आखली आणि त्यामुळे काही विषमता निर्माण होत असेल तर ते योग्य आहे.    Maximin rule – Maximum benefits go to those who are at the lowest level.  

मुळात असमानता कशामुळे आहे?  आपण एका वर्गामध्ये जन्म घेतो.  ते कोणाच्याच हाती नाही.  परंतु जे श्रीमंत घराच जन्म घेतात त्यांना पुढे आयुष्यभर त्याचा फायदा मिळत राहतो आणि जे गरीब घरात जन्म घेतात त्यांना त्याचा तोटा कायम सहन करावा लागतो.  गरीब कुटुंबात जन्मल्यामुळे काही संधी ज्या मिळायला हव्या होत्या त्या मिळू शकलेल्या नाहीत.  खूप प्रयत्न करूनही अशा माणसांना आपल्या वर्गाची मर्यादा पार करता येत नाही.  याला जबाबदार कोण?  (यावर काही लोक कर्म सिद्धांत मांडतील – प्रत्येक माणूस आपल्या कर्माची फळे भोगतो.)

समाजातील सर्व माणसांकडे काही गुण आहेत.  समाजाने या सर्व लोकांना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांचा फायदा करून घेतला पाहिजे – reciprocity – देवाणघेवाण, परस्पर सहकार्य – एकमेकांच्या गुणांचा फायदा एकमेकांना झाला पाहिजे.

Distributive justice – वितरणात्मक न्याय – We have to distribute the goods – What are the goods?  – Freedom, Wealth, Opportunities, Status – संपत्तीचे न्याय्य वितरण झाले पाहिजे – स्वातंत्र्य, संपत्ती, संधी, दर्जा या सगळ्या गोष्टींचा समावेश या संपत्तीच्या संकल्पनेमध्ये होतो.  

अशी विषमता ज्या अधिकारपदांमुळे किंवा सामाजिक स्थानामुळे होत असेल ती अधिकारपदे वा सामाजिक दर्जा मिळवण्याच्या संधी सर्वांना समानतेने उपलब्ध असल्या पाहिजेत (MPSC-UPSC exams) FEO – Fair equality of opportunity – समान संधीचे तत्त्व.  

समानसंधीकाद्यावी?  

प्रत्येकाला समान संधी मिळायलाच हवी आहे कारण – त्यामुळेच प्रत्येक माणूस आपला स्वाभिमान जपू शकतो.  प्रत्येकाचा स्वाभिमान जपला जाईल तेव्हाच तो समाजाचा एक चांगला आधार बनू शकतो आणि सगळे लोक एकजुटीने राहू शकतील.  जर एखाद्याला समान संधी दिली नाही तर समान नागरिक म्हणून आपण त्यांचा सन्मान नाकारत आहोत.  

अशी समान संधी कशी मिळू शकेल?  त्याचे मार्ग कोणते ?  

इच्छित सामाजिक-राजकीय पदांवर प्रवेशावरील निर्बंध नसावेत.

शिक्षणामध्ये सर्वांना समान संधी मिळावी.

रॉल्स चे विषमतेचे तत्त्व अत्यंत मूलगामी परिवर्तन घडवून आणणारे तत्त्व आहे – अत्यंत पुरोगामी – वंचितांच्या उत्थानासाठी गरजेचा प्रक्रियात्मक उपाय.  हा उपाय सुचवताना रॉल्स उपयुक्ततावादावर टीका करतात.  Greatest  happiness of the greatest number या मध्ये काही जणांचा समावेश होत नाही.  वंचित मागेच राहतात.

महात्मा गांधींनी याला अंत्योदयाचा पर्याय दिला होता.

The following is Gandhi ji’s Talisman:

Recall the face of the poorest and the weakest man [woman] whom you may have seen, and ask yourself, if the step you contemplate is going to be of any use to him [her]. Will he [she] gain anything by it?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही सामाजिक न्यायाबद्दल एक वेगळी मांडणी केलेलीच होती, So we are blessed.  पण पाश्चिमात्य देशात उदारमतवाद, व्यक्तीवाद या चौकटीत सार्वजनिक धोरणे अंमलात आणली गेली.  Trickle down effect – संपन्नता खालच्या स्तरापर्यंत आपोआप झिरपत जाईल –  होईल असा त्यांचा विश्वास होता.  रॉल्सना हे मान्य नाही.  झिरपण आत्तापर्यंत झालेल नाही, ते होणारही नाही.  विचारपूर्वक काही हस्तक्षेप सरकारला करावे लागतील.  या हस्तक्षेपामुळेच समाजातील वंचितांपर्यंत प्रगतीचे फायदे पोहचवता येणार आहेत.  

Actualisation of principles – तत्त्वे प्रत्यक्षात आणण्याचे मार्ग

न्यायाची संकल्पना वास्तवात आणण्यासाठी रॉल्सनी एक चौकट मांडलेली आहे.  चार टप्प्यात न्यायाची संकल्पना वास्तवात आणता येईल.  

संविधानाचीनिर्मीती– या टप्प्यावर अज्ञानाचा पडदा थोडा दूर केला जाईल.  अज्ञानाचा पडदा चौथ्या टप्प्यावर पूर्णपणे दूर केला जाईल.  घटनात्मक लोकशाही आणायची आहे.  

संस्थांचीनिर्मीती – कायदेमंडळ, कार्याकारीमंडळ, न्यायमंडळ, आर्थिक संस्था – रॉल्स भांडवलशाही आणि साम्यवाद दोन्ही व्यवस्था नाकारतात.  Property owning democracy चा पर्याय ते देतात.  या टप्प्यावरही अज्ञानाचा पडदा असणारच.

कायदेमंडळविषमतेच्या तत्त्वाच्या आधारे कायदे बनवले जातील.

अंमलबजावणीनागरिकांची कर्त्वये आणि नागरिकांवरील बंधने – या टप्प्यावर अज्ञानाचा पडदा दूर होईल.

राजकीय आणि आर्थिक व्यवस्था कोणत्या प्रकारची असेल?

सांविधानिक लोकशाही – Constitutional democracy – न्यायाच्या तत्त्वांवर आधारित सुसंघटीत समाज – Well ordered society – ही एक औपचारिक संकल्पना आहे.  या समाजातील नियम लोक स्वेच्छेने पाळतील कारण त्यांनी स्वतःच ते बनवलेले आहेत.  ते निःपक्षपातीपणे बनवलेले आहेत.  त्यामुळे ते सर्वांच्या हिताचे असणार.  न्यायाबद्दल नागरिकांमध्ये सहमती असणार आहे.  

आर्थिक व्यवस्था

Property owning democracy – 

उत्पादनाच्या साधनांची मालकी अनेकांकडे – रॉल्स खाजगी मालमत्तेच्या विरोधी नाही.  भांडवलशाहीमध्ये भांडवलदार वर्गाकडे उत्पादन साधनांची मालकी असते.  कामगार वर्ग आणि इतर या साधनांपासून वंचित राहतात.  रॉल्स यांचा प्रयत्न न्यायाच्या तत्त्वाचा शक्य तितका अधिक प्रसार करणे आणि अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहचवणे हा आहे.  उत्पादनाच्या साधनांची मालकी वंचितांपर्यंत पोचली पाहिजे असे त्यांचे मत आहे.

उत्पन्न आणि संपत्तीची असमानता कमीत कमी

संधीची समानता

न्याय्य राजकीय स्वातंत्र्य

सार्वत्रिक शिक्षण आणि सार्वत्रिक आरोग्य सेवा

Political Liberalism – राजकीय उदारमतवाद – १९९३ चे पुस्तक

A theory of justice मध्ये न्यायासंबंधी मांडलेले विचार हे आदर्शवादी होते हे रॉल्स या पुस्तकात मान्य करतात.  जनतेमध्ये १०० टक्के सहमती होईल की नाही यांची त्यांना खात्री वाटत नाही.  Democratic societies are plural societies – लोकशाही समाज हे बहुसत्ताक असतात.  धर्म, जात, भाषा, प्रांत या मुद्‌दयांवरून मतभेद अशा समाजांमध्ये असणार आहेत.  ते वाजवी असू शकतात.  परंतु असे मतभेद असले तरी एक overlapping consensus निर्माण होऊ शकतो.  Overlapping consensus म्हणजे काय – वेगवेगळ्या भूमिका आणि अस्मिता असतानाही विवेकी नागरिक – Reasonable citizens – न्यायाची एक संकल्पना निर्माण करू शकतील.  मतभेदांच्या पलिकडे जाऊन न्यायाच्या काही किमान तत्त्वांबद्दल आपले एकमत होऊ शकते.  

Law of peoples – तिसरे पुस्तक

आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भातील पुस्तक

थेअरी ऑफ जस्टीस वरील टिका

रॉल्स चा सिद्धांत पाश्चिमात्य जग डोळ्यापुढे ठेऊन मांडला आहे ही मुख्य टिका त्यांच्या पुस्तकावर आणि सिद्धांतावर होते.  

वितरणात्मक न्यायाची संकल्पना – Distributive Justice

Loading

Similar Posts