अँटोनिओ ग्राम्सी

२३ जानेवारी १८९१ ते २७ एप्रिल १९३७ – अवघे ४६ वर्षाचे आयुष्य लाभले – इटलीमधील औद्योगिक दृष्ट्या मागास अशा सार्डीनिया प्रांतामध्ये जन्म – ग्राम्सी यांना लहानपणापासून अनेक शारिरिक व्याधींना तोंड द्यावे लागले होते. बालपण अत्यंत कठीण होते. त्याचे वडील कार्यालयातील काही प्रकारांमुळे तुरुंगात गेले होते.

सार्डीनिया या बेटाचे स्थान पहा – भूमध्य समुद्रात इटलीच्या मुख्य भूमीच्या पश्चिमेला असलेला औद्योगिक दृष्ट्या अप्रगत भाग – या बेटावर ग्राम्सीचा जन्म झाला.

– इटालियन मार्क्सवादी – नवमार्क्सवादी –इटलीमधील साम्यवादी पक्षाचा संस्थापक – ट्युरीन विद्यापीठात उच्चशिक्षण – ट्युरीन हा भाग इटलीच्या उत्तर भागामध्ये आहे.

ट्युरीन – इटलीच्या उत्तरेकडे

– १९१४ मध्ये समाजवादी पक्षात सामील – पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान मार्क्सवादाचा अभ्यास – मे १९१९ मध्ये – The New Order (Italian – L’Ordine Nuovo) ह्या वर्तमानपत्राची सुरवात.

फॅक्टरी कौन्सिल च्या स्थापनेस प्रोत्साहन – या कौन्सिलांच्या सहाय्याने १९२० मध्ये ट्युरीन मध्ये संप घडवून आणला. त्यामध्ये ग्राम्सीची भूमिका महत्त्वाची होती.

बेनिटो मुसोलिनी

१९२१ मध्ये समाजवादी पक्षातून बाहेर पडून त्यांनी साम्यवादी पक्षाची स्थापना केली. पुढची दोन वर्षे ते सोव्हिएट युनियन मध्ये होते. इटलीमध्ये परत आल्यानंतर १९२४ मध्ये ते साम्यवादी पक्षाचे प्रमुख झाले. १९२६ मध्ये फॅसिस्ट नेता मुसोलिनीने साम्यवादी पक्ष बेकायदेशीर ठरवून ग्राम्सीला अटक केली. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. खटल्याच्या वेळी सरकारी वकील म्हणाले – At his trial the fascist prosecutor argued, “We must stop his brain from working for 20 years.”

तुरंगामध्ये अत्यंत कठीण परिस्थितही त्यांनी आपला अभ्यास चालू ठेवला. इटालियन समाजाचे विश्लेषण करून त्यामध्ये बदल करण्यासंबंधीचे त्यांचे चिंतन चालूच होते. तिथेच त्यांनी जे लिखाण केले ते नंतर Prison notebooks या नावाने प्रसिद्ध झाले – Lettere dal carcere (1947; Letters from Prison).

धुरिणत्व

संदर्भ

  1. Britannica, The Editors of Encyclopaedia. “Antonio Gramsci“. Encyclopedia Britannica, 19 Jan. 2021, https://www.britannica.com/biography/Antonio-Gramsci Accessed 16 April 2021.
  2.  (n.d.). Antonio Gramsci – Wikipedia. Retrieved April 16, 2021, from https://en.wikipedia.org/wiki/Antonio_Gramsci

Loading

Similar Posts