|

हैद्राबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि स्वामी रामानंद तीर्थ

हैदराबाद भारतात सामील करण्यासाठी किती रक्त सांडावं लागलं? – बीबीसी न्यूज मराठी

स्वामी रामानंद तीर्थ

स्वामी रामानंद तीर्थ

स्वामीरामानंदतीर्थ : (३ ऑक्टोबर १९०३-२ जानेवारी १९७२). हैदराबाद (दक्षिण) स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर.त्यांचा जन्म कर्नाटकातील सिंदगी (जिल्हा विजापूर) येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांनी दोन मुलींनंतर संन्यास घेतला पण पत्नीची संमती घेतली नाही. तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना परत गृहस्थाश्रमात जाण्याची आज्ञा दिली. त्यानंतर त्यांना हे पुत्ररत्न झाले. जन्मगावी प्राथमिक शिक्षण घेऊन ते सोलापूरच्या नॉर्थकोट हायस्कूलमध्ये दाखल झाले. तिथे मॅट्रिकला असताना गांधी टोपी घातली म्हणून स्वामीजींना छड्या खाव्या लागल्या पण टोपी काढण्याचा हुकूम त्यांनी पाळला नाही. त्यांना शाळेतून बहिष्कृत केले गेले. तेव्हा त्यांनी एका राष्ट्रीय विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा दिली आणि पुढे अमळनेर व पुणे येथील महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांसह बी.ए. व ‘लोकशाहीचा विकास’ हा प्रबंध लिहून एम्.ए. पदवी संपादन केली. त्यानंतर १९२६ मध्ये ना. म. जोशी यांच्या स्वीय साहाय्यकपदी ते रुजू झाले. त्यामुळे आपाततः गिरणी कामगारांच्या लढ्यात ते सक्रिय सहभागी झाले. तत्पूर्वी लोकमान्य टिळकांच्या निधनाने ते अतीव दुःखी झाले. त्यांनी त्या वेळी ‘या क्षणापासून माझे सर्व उर्वरित जीवन मी मातृभूमीच्या चरणी वाहत आहे, सर्व सुखांचा त्याग करून मी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीन’, अशी प्रतिज्ञा केली आणि आयुष्यभर तिचे पालन केले.1स्वामी रामानंद तीर्थ – मराठी विश्वकोश

Loading

Similar Posts