Paper 5 Indian Political Thought – April 2022 summary

Paper 5 Political Thought राजकीय विचार
Semester 6 – Indian Political Thought – भारतीय राजकीय विचार

Module 1 – घटक १
Ideas on State – राज्यासंबंधीचे विचार

Mahadev Govind Ranade – महादेव गोविंद रानडे (1842 – 1901)

आधुनिक महाराष्ट्राचे जनक, उदारमतवादी विचारप्रणालीचे समर्थक – न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – धार्मिक सुधारणा केल्या पाहिजेत हा त्यांचा आग्रह होता. विधवा पुनर्विवाहाचे त्यांनी समर्थन केले. स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना काही तडजोडी कराव्या लागल्या. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यावर वडीलांचे मन राखण्यासाठी त्यांना एका लहान मुलीशी – रमाबाई रानडे – यांच्याशी विवाह करावा लागला. सर्वांना बरोबर घेऊन सुधारणा हा त्यांचा आग्रह होता. त्यांना सुधारणांसाठी नाती तोडायची नव्हती. परंतु त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यांच्यावरील मृत्यूलेखात लोकमान्य टिळक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. बालविवाह केला तरी रानड्यांनी रमाबाईंना इंग्रजी शिक्षण दिले, समाजकार्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले. रमाबाईंनी रानड्यांच्या मृत्यूनंतर जवळपास दोन दशके आपले समाजकार्य सेवासदन आणि इतर संस्थांच्या माध्यमातून चालू ठेवले. त्यांनी रानड्यासंबंधीची काही पुस्तकेही प्रकाशित केली.

इंग्रज सरकारसंबंधीची त्यांची मते काहीशी वेगळी होती. त्यांच्या मते इंग्रज इथे येणे हा एका दैवी योजनेचा भाग होता. इंग्रज इथे आल्यामुळे आपल्याला इंग्रजी भाषेचा आणि त्यामार्फत अनेक भौतिक आणि सामाजिक शास्त्रांचा परिचय झाला. आपले ज्ञान वाढले. राजकीय व्यवस्था सुधारली. लोकशाही, स्वातंत्र्य, समानता, व्यक्तीवाद या मूल्यांचा परिचय झाला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आंदोलन न करता आधी त्यांच्याकडे जे आहे ते आत्मसात केले पाहिजे – त्यानंतर आपोआप स्वातंत्र्य प्राप्त होईल.

Mohandas Karamchand Gandhi मोहनदास करमचंद गांधी (1869 – 1948)

गांधींनी नामदार गोपाळ कृष्ण गोखलेंना आपले गुरु मानले होते. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर गोखल्यांनी त्यांना भारतभ्रमण करून भारताची माहिती करून घेण्याचा सल्ला दिला होता.

सत्य, अहिंसा या आधारावर असहकार (१९२०), सविनय कायदेभंग (१९३०) आणि चलेजाव चळवळ (१९४२, ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई) चालवणारे महात्मा गांधी – हिंद स्वराज या त्यांच्या पुस्तकात त्यांनी पाश्चिमात्य संस्कृतीवर टीका केली आहे. महात्मा गांधींनी एका रेल्वे प्रवासात जॉन रस्कीय या प्रसिद्ध लेखकाचे अन टु धीस लास्ट हे पुस्तक वाचले – अंत्योदय असे त्याचे भाषांतर त्यांनी केले आणि पुढे अंत्योदया ऐवजी सर्वोदय हा शब्द त्यांना अधिक योग्य वाटला कारण अंतिम माणसाचा उदय होण्याची गरज असते तशीच श्रीमंत, प्रगत माणसाचा स्वार्थ सुटला पाहिजे, नफ्याची नशा कमी झाली पाहिजे – म्हणजेच त्याचाही उदय झाला पाहिजे. सर्वोदयाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी विश्वस्त व्यवस्थेची संकल्पना त्यांनी मांडली. एकूणच उच्च नैतिक मूल्यांचा आग्रह हा त्यांच्या विचारसरणीचा पाया होता.

१९२५ ते १९२९ या काळात आपल्या नवजीवन या नियतकालिकात त्यांनी एका लेखमालेत आत्मचरित्र प्रकाशित केले. नंतर ते पुस्तक रुपात प्रसिद्ध झाले. महादेव देसाई यांनी त्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले.

Module 2 – घटक २
Nationalism – राष्ट्रवाद

Rabindranath Tagore – रविंद्रनाथ टागोर (1861 – 1941)


१९१३ मध्ये गीतांजली या आपल्या काव्यसंग्रहासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले बिगर युरोपियन रविंद्रनाथ टागोर – कलकत्यामधील एका संपन्न घराण्यात त्यांचा जन्म झाला.

१९०१ साली स्थापन झालेले शांतीनिकेतन – १९२१ मध्ये त्याचे रुपांतर विश्वभारती विद्यापीठामध्ये झाले.

१९१९ मध्ये ब्रिटीश सरकारने त्यांना Knight म्हणजे सरदार ही पदवी घोषित केली. परंतु त्याच वर्षी अमृतसरमधील जालियानवाला बाग येथे झालेल्या हत्याकांडाचा निषेध म्हणून त्यांनी ती नाकारली.

Vinayak Damodar Savarkar – विनायक दामोदर सावरकर (1883 – 1966)

नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात जन्मलेले, इटलीचा विचारवंत गुसेपी मॅझिनी याच्या विचारांनी प्रभावित झालेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर – हिंदूत्वाची पहिली व्याख्या – पितृभू, पुण्यभू – जैन, शीख, बौद्ध यांना सामावून घेणारी व्याख्या – ख्रिश्चन, मुस्लीम यांना वगळणारी व्याख्या. त्यांनी हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. १८५७ च्या उठावावर आधारित १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे त्यांचे पुस्तक गाजले. त्याच्या प्रकाशनाआधीच त्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याच्या प्रती घरी सापडल्यास अटक केली जात होती. तरीही लोक या पुस्तकाच्या प्रती मिळवून वाचत होते.

त्यांची काही पुस्तके

  1. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने Six Glorious Epochs in Indian History
  2. हिंदू पद-पादशाही
  3. १८५७ चे स्वातंत्र्यसमर
  4. इनसाईड द एनिमी कॅम्प
  5. हिंदू राष्ट्र दर्शन
  6. काळे पाणी
  7. माझी जन्मठेप
  8. कमला
  9. मॅझिनीचे चरित्र

Module 3 घटक ३
Rational and Radical Reform – विवेकाधिष्ठीत आणि मूलगामी सुधारणा

Bhimrao Ramji Ambedkar – भीमराव रामजी आंबेडकर (1891 – 1956)

अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी जीवनभर कार्य करणारे, मूकनायक, बहिष्कृत भारत ही मासिके चालवणारे,

  1. अनाहिलेशन ऑफ कास्ट,
  2. दी अनटचेबल्स,
  3. कास्ट्स इन इंडीया
  4. स्टेट अँड मायनॉरीटीज

या पुस्तकांचे लेखक, राजकीय, आर्थिक सुधारणा यापेक्षा सामाजिक सुधारणांना अधिक महत्त्व देणारे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर – हिंदूंचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे अशी टीका त्यांनी केली होती – पाणी भरण्याची सोय नसलेली टाकी – जमवून घेऊन राहणारे लोक.

मध्य प्रदेशमधील महू येथे बाबासाहेबांचा जन्म झाला. त्यांचे वडील लष्करात होते. बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्यांच्या अमेरिकेतील आणि इंग्लंडमधील उच्च शिक्षणाची सोय केली, नंतर त्यांना नोकरीही दिली. परंतु जातीयवादामुळे तिथे ते राहू शकले नाही.

१९२० नंतर त्यांनी आपल्या समाजकार्याला मोठ्या प्रमाणावर सुरवात केली. सुरवातीला त्यांना उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील लोकांना समजावून सांगण्याचा पवित्रा घेतला होता. १९२७ च्या महाड येथिल चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून त्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला.

त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली. असे मतदारसंघ मुस्लिमांना देण्यात आले होते – अशा मतदारसंघात उमेदवार आणि मतदार केवळ दलित असणार होते. महात्मा गांधींनी याला विरोध केला. आमरण उपोषण केले – ते २१ दिवस चालले. शेवटी बाबासाहेबांनी माघार घेतली. स्वतंत्र मतदारसंघांची आपली मागणी सोडून दिली. त्यानंतर त्यांच्या मध्ये आणि महात्मा गांधीमध्ये प्रसिद्ध पुणे करार झाला.

१९३० च्या दशकात त्यांनी इंडीपेंडट लेबर पार्टी आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या दोन राजकीय पक्षांची स्थापना केली. रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया ची स्थापना करण्याचा त्यांचा मानस होता परंतु त्यांच्या मृत्यूनंतर १९५७ साली त्याची स्थापना झाली. त्यांच्या हयातीत ती होवू शकली नाही.

बाबासाहेबांनी घटना समितीच्या कार्यात भाग घेतला. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना पहिल्या मंत्रीमंडळात कायदा मंत्रीपद दिले होेते. परंतु काही काळानंतर हिंदू कोड बील पास न करू शकल्यामुळे बाबासाहेबांनी त्या पदाचा राजीनामा दिला. मंत्रीमंडळातील अनेकांचा या विधेयकाला विरोध होता त्यामुळे पंतप्रधान नेहरूंचाही नाईलाज झाला होता.

Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर (1856 – 1895)

जेमतेम ३९ वर्षांचे (३८ वर्षे ११ महिने ४ दिवस) आयुष्य त्यांना लाभले – अल्पावधीमध्ये त्यांनी मोठे कतृत्व गाजवले – १८८१ सारी सुरु झालेल्या केसरीचे ते पहिले संपादक होते – टिळकांच्या बरोबर वाद झाल्याने त्यांनी केसरी सोडला आणि १८८८ साली सुधारक हे नवे वृत्तपत्र सुरु केले. टिळक, चिपळूणकर इत्यादींबरोबर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्यूकेशन सोसायटी आणि त्यामार्फत चालू केलेले फर्गसन कॉलेज इत्यादी संस्थांमध्ये भाग घेतला. “एकाने दुसऱ्याचा विवाह ठरवणे म्हणजे बालविवाह.” हे त्यांचे वाक्य त्यांचे विचार स्पष्ट करणारे आहे.

Module 4 घटक ४
Socialism – समाजवाद

Ram Manohar Lohia राममनोहर लोहीया (1910 – 1967)

भारतातील समाजवादी चळवळीचे जनक – डॉ. राम मनोहर लोहीया – यांचे समाजवादी विचार पाश्चिमात्य समाजवादी विचारांपेक्षा वेगळे होते. ते साम्यवाद आणि भांडवलवाद या दोन्ही विचारप्रणालींवर टीका करीत होते. त्यांनी भारतीय परिस्थितीशी जुळणारी वेगळी समाजवादी व्यवस्था आणि विचारप्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या समाजवादी विचारांवर ते टीका करीत होते.

लोहीया सुरवातीला काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. नंतर ते काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत तयार झालेल्या डाव्या विचारसरणीच्या गटामध्ये सामील झाले. १९४८ मध्ये गांधी हत्येनंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडले. १९५२ मध्ये प्रजासमाजवादी पक्षाची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता. १९६३ मध्ये एका पोटनिवडणुकीत त्यांचा पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश झाला. १९६७ मध्येही ते निवडून आले.

  1. हिंदू बनाम हिंदू
  2. मार्क्स, गांधी आणि समाजवाद (Marx, Gandhi and Socialism)
  3. इतिहास चक्र – Wheel of History
  4. Guilty Men of India’s Partition
  5. India, China and Northern frontiers
  6. The Struggle for civil liberties
  7. Nehru : A critical assessment
  8. भारत के शासक
  9. Foreign policy : pre-independence writings, post-independence writings, Asian socialism, World government, India and Pakistan
  10. Economics after Marx
  11. Will to power – collection of writings
  12. Interval during politics – language (non-political writings of Dr. Lohia.)

डॉ. लोहीयांनी Mankind नावाचे मासिक १९५६ ते १९६२ आणि १९६६ ते १९६७ दरम्यान चालवले.

Jawaharlal Nehru – जवाहरलाल नेहरू (1889 – 1964)

भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, मोतीलाल नेहरूंचे चिरंजीव, त्यांचे उच्चशिक्षण इंग्लंड मध्ये झाले स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग, महात्मा गांधींचे मानसपुत्र – आणि असे असले तरी गांधींच्या ग्रामस्वराज्याला आणि यंत्र विरोधाला विरोध करणारे – त्यांचे एक दुःख होते – त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर ब्रिटीश आणि युरोपियन विचारवंतांचा प्रचंड प्रभाव होता आणि ते भारतीय असल्यामुळे त्यांच्यावर भारतीय परंपरांचा अभ्यास दांडगा होता – त्यांचे एक विचित्र संमिश्र व्यक्तित्व तयार झाले होते – युरोप आणि भारतात – दोन्ही ठिकाणी त्यांना परके मानले जात होते. डिस्कवरी ऑफ इंडीया, ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी आणि त्यांचे आत्मचरित्र ही त्यांची गाजलेली पुस्तके.

नेहरूंनी भारतीय राष्ट्रवादाला धर्मनिरपेक्ष आशय दिला.

प्रत्येक विचारवंतावरील अधिक सचित्र माहितीसाठी हा लेख वाचा.

Loading

Similar Posts