Question bank FYBA – Semester 2

Paper pattern and syllabus – प्रश्नपत्रिकेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम

Marks 100 Duration 3 hrs गुण १०० वेळ ३ तास

प्रश्नपत्रिका दोन भागात असेल – पहिल्या भागात २५ वस्तुनिष्ठ प्रश्न (objective questions – multiple choice questions) असतील – प्रत्येक प्रश्नाला दोन गुण – म्हणजे पहिल्या भागाचे एकूण गुण ५०. पहिल्या भागाची प्रश्नपत्रिका तुम्हाला परिक्षा सुरु झाल्यानंतर वर्गात दिली जाईल. पहिल्या अर्ध्यातासात हे २५ वस्तुनिष्ठ सोडवायचे आहेत. त्यानंतर उरलेल्या अडीच तासात पेपरचा दुसरा भाग सोडवायचा आहे.

पेपरचा दुसरा भाग ५० गुणांचा असेल यामध्ये तुम्हाला वर्णनात्मक प्रश्न सोडवायचे आहेत. चार १० गुणांचे प्रश्न आणि प्रत्येकी ५ गुणांच्या दोन टीपा असे एकूण सहा प्रश्न तुम्हाला अडीच तासात सोडवायचे आहेत. त्याचे स्वरुप असे असेल :-

Q. no. 1 – Answer any four questions from the following (each question carries 10 marks – total marks 40). कोणत्याही चार प्रश्नांची उत्तरे द्या (प्रत्येक प्रश्नाला १० गुण आहेत – एकूण गुण ४०)

  1. Topic 1
  2. Topic 1
  3. Topic 2
  4. Topic 2
  5. Topic 3
  6. Topic 3
  7. Topic 4
  8. Topic 4

तुमच्या syllabus मध्ये चार धडे (ज्याला modules म्हणतात) आहेत. प्रत्येक धड्यावर दोन प्रश्न विचारले जातील.


Syllabus – अभ्यासक्रम – भारतीय राजकीय प्रक्रिया

1. CHANGING NATURE OF FEDERAL SYSTEM

1.1 CENTRE-STATE RELATIONS WITH REFERENCE TO FISCAL AND EMERGNCY POWERS.
1.2 DEMAND FOR GREATER AUTONOMY
1.3 CHANGING DYNAMICS OF CENTRE-STATE RELATIONS

2. PARTY POLITICS AND ELECTIONS

2.1 NATIONAL PARTIES – FEATURES
2.2 REGIONAL PARTIES – CHARACTERISTICS
2.3 ANALYSIS OF ELECTORAL PERFORANCE OF NATIONAL AND REGIONAL PARTIES SINCE 1989.

3. SOCIAL DYNAMICS
3.1 CASTE (WITH REFERENCE TO RESERVATION)
3.2 RELIGION (WITH REFERENCE TO COMMUNALISM)
3.3 GENDER (WITH REFERENCE TO POLITICAL PARTICIPATION)

4. CHALLENGES TO NATIONAL SECURITY
4.1 CRIMINALISATION OF POLITICS
4.2 INTERNAL THREATS TO SECURITY (WITH REFERENCE TO
NAXALISM AND INSURGENCY)
4.3 GLOBAL TERRORISM


वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या सरावासाठी हे प्रश्न सोडवा


पेपरच्या दुसऱ्या भागात येऊ शकतील असे काही प्रश्न खाली दिले आहेत.

  1. Answer any four questions out of the following प्रत्यक्ष पेपर मध्ये आठ पैकी चार प्रश्न सोडवायचे आहेत. (40)
    1. Write briefly about the origin of the federal system in USA. अमेरिकेमधील संघराज्य प्रणालीच्या उत्पत्तीबद्दल थोडक्यात लिहा.
    2. Discuss the changing dynamics of centre-state relations since independence. स्वातंत्र्यानंतर केंद्र-राज्य संबंधांच्या बदलत्या परिस्थितीची चर्चा करा.
    3. Discuss the changing nature of Indian federal system. भारतीय संघराज्य व्यवस्थेच्या बदलत्या स्वरूपाची चर्चा करा.
    4. Discuss the main features of Indian political party system. भारतीय राजकीय पक्ष व्यवस्थेच्या मुख्य वैशिष्ट्यांची चर्चा करा.
    5. What are national parties? Discuss their features. राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय ? त्यांच्या वैशिष्ट्यांची चर्चा करा.
    6. What are regional parties? Discuss their features. प्रादेशिक पक्ष म्हणजे काय? त्यांच्या वैशिष्ट्यांची चर्चा करा.
    7. Discuss the structure, ideology and electoral performance of any one regional political party. कोणत्याही एका प्रादेशिक राजकीय पक्षाची रचना, विचारधारा आणि निवडणुकीतील कामगिरीची चर्चा करा.
    8. Discuss any one lok sabha election since 1989. (लोकसभा निवडणुकांची यादी खाली पहा.). 1989 नंतरच्या कोणत्याही एका लोकसभा निवडणुकीची चर्चा करा.
    9. Explain the influence of caste on Indian politics. भारतीय राजकारणावरील जातीचा प्रभाव स्पष्ट करा.
    10. Explain the concept of communalism or communal politics. जमातवाद आणि जमातवादी राजकारण या संकल्पना स्पष्ट करा.
    11. Explain with suitable examples the concept of criminalisation of politics. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची संकल्पना योग्य उदाहरणांसह स्पष्ट करा.
    12. What are the current major internal threats to the security of India? भारताच्या सुरक्षेला सध्याचे प्रमुख अंतर्गत धोके कोणते आहेत?
    13. Briefly discuss the history of naxalism in India. भारतातील नक्षलवादाच्या इतिहासाची थोडक्यात चर्चा करा.
    14. Briefly review the history of global terrorism. जागतिक दहशतवादाच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घ्या
  2. Write short notes on any two of the following खालीलपैकी कोणत्याही दोन टीपा लिहा. (१०)
    1. State autonomy राज्यांची स्वायत्तता
    2. National parties राष्ट्रीय पक्ष
    3. 2019 Lok Sabha elections २००९ च्या लोक सभा निवडणुका
    4. Election commission of India भारतीय निवडणुक आयोग
    5. Tamil insurgency तामिळांचे बंड
    6. Israel and global terrorism इस्त्रायल आणि जागतिक दहशतवाद
    7. 9/11 incidents – Terrorist attack on USA ९/११ च्या घटना – अमेरिकेवरील दहशतवादी हल्ला
    8. 26/11 – Terrorist attack on India २६/११ भारतावरील दहशतवादी हल्ला
    9. Palestine Liberation Organisation पॅलेस्टाईन मुक्ती संघटना
    10. Irish Republican Army आयरीश रिपब्लीकन आर्मी

Lok Sabha elections in India

From Wikipedia

Highlights of the syllabus – अभ्यासक्रमातील काही महत्त्वाचे मुद्दे – Check this page

  1. जातीच्या राजकीयीकरणाचा सिद्धांत – रजनी कोठारी – प्रभुत्वशाली जातीचा सिद्धांत – एम. एन. श्रीनिवास
  2. झारखंड, उत्तरांचल, छत्तीसगड ही राज्ये २००० साली स्थापन झाली. 
  3. संघराज्य व्यवस्थेमध्ये सत्तेचे प्रादेशिक विभाजन केले जाते. 
  4. भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीमध्ये एकूण ३ याद्या आहेत – ज्यामध्ये केंद्र आणि राज्यामधील सत्तेचे विभाजन नोंदवलेले आहे. 
  5. संघराज्य पद्धतीचा उगम अमेरिकेमध्ये झाला.
  6. भारतामध्ये वित्त आयोग दर पाच वर्षांनी स्थापन केला जातो
  7. नियोजन आयोगाच्या ऐवजी निती आयोगाची स्थापना २०१५ साली करण्यात आली.
  8. भारतातील राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष शोधा
  9. शरद जोशी हे शेतकरी संघटनेचे नेते होते
  10. नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व मेधा पाटकर यांनी केले होते
  11. राम विलास पासवान हे लोक जनशक्ती पक्षाचे नेते होते.  त्यांचा सर्वाधिक मतांच्या फरकाने निवडून येण्याचा विक्रम माजी पंतप्रधान नरसिंहाराव यांनी मोडला होता.
  12. ऑपरेशन ब्लु स्टार १९८४ साली अमृतसर येथील सुवर्णमंदीरात घडले.
  13. नक्षलवादाची सुरवात पश्चिम बंगालमध्ये झाली
  14. आर्थिक आणिबाणी – कलम क्र. ३६०, राष्ट्रीय आणिबाणी – कलम क्र. ३५२
  15. पी. ए. संगमा हे मेघालयातील नेते होते, लालडेंगा हे मिझोराममधील नेते होते
  16. सुभाष घिशींग हे गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट चे नेते होते.
  17. अकाली दल हा प्रादेशिक पक्ष कोणत्या राज्यातील आहे ते शोधा
  18. चंदीगड ही पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांची राजधानी आहे.
  19. यासर अराफत हे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचे नेते होते, व्ही. प्रभाकरन हे श्रीलंकेमधील लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम चे नेते होते
  20. बोको हराम या दहशतवादी संघटनेची स्थापना नायजेरिया मध्ये झाली
  21. मुअम्मर गडाफी हे लिबीयाचे नेते होते
  22. मुल्ला ओमर यांनी तालिबानची स्थापना केली
  23. रोहींग्यांची सर्वाधिक लोकसंख्या म्यानमार मध्ये आहे.
  24. विद्या बाळ या मिळून साऱ्याजणी हे स्त्रीवादी विचारांना वाहिलेले मासिक प्रकाशित करीत असत
  25. कारगील चे युद्ध कोणत्या साली झाले ते शोधा 
  26. १९९८ च्या निवडणुका

Loading

Similar Posts