सेमीस्टर २ पेपर क्र. १ – भारतीय राजकीय प्रक्रिया

अनुक्रमणिका

रजनी कोठारी

भारतीय राजकीय प्रक्रिया असा उल्लेख केल्याबरोबर पहिल्यांदा नाव डोळ्यापुढे येते ते प्रा. रजनी कोठारी यांचे. (रजनी हे काही जणांना महिलेचे नाव वाटू शकते.) प्रा. रजनी कोठारी हे भारतीय राजकीय प्रक्रियेचे महान अभ्यासक होते.

(१६ ऑगस्ट १९२८ ते १९ जानेवारी २०१५ – ८६ वर्षे, ५ महिने ३ दिवस)

त्यांचा जातीसंबंधीचा सिद्धांत बराच गाजला – Politicisation of the caste – जातीचे राजकीयीकरण – राजकारणावर जातीव्यवस्थेचा परिणाम होतो हे आपण ऐकून असतो, वाचतो, अनुभवतो परंतु कोठारी यांच्या मते हा प्रभाव दुतर्फी आहे. जातीवरही राजकारणाचा विशेषतः लोकशाही राजकारणाचा प्रभाव पडतो. लोकशाही राजकारणामुळे संख्येला महत्त्व येते. कोणत्याही मार्गाने जास्तीजास्त लोक आपल्या बाजून मतदान करतील यासाठी प्रत्येक राजकारणी प्रयत्नशील असतो. संघटन बांधण्याचा प्रयत्न करतो. जात हे तयार संघटन उपलब्ध असल्यामुळे त्याचा वापर राजकारणासाठी होणार हे नैसर्गीक आहे. पण हे झाल्यामुळे जातीव्यवस्थेचे काही भाग उध्वस्त झाले. ब्राह्मणांची संख्या (भारतात ३ %) असल्यामुळे त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या असलेली सत्ता गेली. मध्यम मानल्या गेलेल्या जातींच्या हाती सत्ता आली. ब्राह्मणांची सत्ता ज्याप्रकारे गेली त्याप्रकारे संख्येच्या आधारावर आपली सत्ता जाऊ नये म्हणून त्यांनी जातीची बंधने तोडून युती करण्यास सुरवात केली. उदा. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने रिपब्लीकन पक्षाशी केलेली युती – शरद पवार आणि रामदास आठवले. उत्तरप्रदेशातील भाजप आणि बसप यांची युती पहा. अशा युतींमुळे काही काळानंतर जातीसंस्थेचे महत्त्व कमी होत जाईल आणि केवळ राजकीय / वैचारिक भेद कायम राहतील असे कोठारी यांना वाटत होते.

प्रत्यक्षात काही प्रमाणात जातीव्यवस्थेवर राजकारणाचा परिणाम झाला हे खरे परंतु भारतात विशेषतः उत्तर भारतात जातीव्यवस्थेचा पगडा अजून खूप जाणवतो. विशेषतः हिंदी पट्ट्यामध्ये अधिक.

या हिंदी पट्ट्याला बिमारू राज्ये असेही म्हणतात. बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश – यांची अद्याक्षरे घेऊन – BIMARU हा शब्द तयार करण्यात आला आहे. (२०१७ मध्ये गुजरातमध्येही डॉक्टरांचा तुटवडा भासू लागल्यामुळे या नकाशात गुजरातचा समावेश बिमारू राज्यांंबरोबर केला आहे. परंतु परिस्थिती तितकी वाईट नसल्यामुळे हे राज्य लाल रंगात तर बिमारू राज्ये वेगळ्या रंगात दाखवली आहेत.)

२००० सालामध्ये केंद्रात भाजपप्रणीत आघाडीचे वाजपेयी सरकार सत्तेमध्ये असताना बिमारू पैकी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि बिहारचे विभाजन करून अनुक्रमे उत्तराखंड/उत्तरांचल, छत्तीसगड आणि झारखंड ही तीन नवी राज्ये निर्माण करण्यात आली. हे तिन्ही भाग मूळ राज्यांपेक्षा सर्वार्थाने संपन्न होते आणि मोठ्या राज्यात आमचे शोषण होते आहे अशी त्यांची भावना होती. छत्तीसगड आणि झारखंडमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी राहतात, येथे मोठे जंगल आणि खनिजसंपत्ती आहे. उत्तराखंड किंवा उत्तरांचल हे हिमालयाच्या कुशीतले पर्वतांनी वेढलेले राज्य आहे. हिंदू धर्मीयांची बरीच महत्त्वाची मानली गेलेली तीर्थक्षेत्रे येथे आहेत त्यामुळे त्याला देवभूमी असेही म्हणतात. हरिद्वार, ऋषीेकेष, गंगोत्री (गंगेचा उगम), जमनोत्री (यमुना नदीचा उगम), केदारनाथ, बद्रीनाथ ही त्यामधील काही तीर्थक्षेत्रे.

Uttarakhand is way ahead in per capita income from Jharkhand and  chhttisgarh – News18 हिंदी

संघराज्य व्यवस्था

संघराज्य व्यवस्था ही देश चालवण्यासाठीची एक प्रशासकीय व्यवस्था आहे. संघराज्य व्यवस्थेचा उगम अमेरिकेत झाला. यामध्ये मुख्यतः केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये सत्तेचे विभाजन केले जाते. भारतीय राज्यघटनेमध्ये या प्रकारच्या सत्ता विभाजनाची नोंद आहे. घटनेच्या ७ व्या सूचीमध्ये तीन याद्यांच्या मदतीने सत्तेचे विभाजन करण्यात आले आहे. केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा या ती याद्या आहेत. (Central list, State list and concurrent list). केंद्र सूची मध्ये फक्त केंद्र सरकारने करायच्या कामांची यादी, राज्य सूची मध्ये राज्यांनी करायची कामे आणि समवर्ती सूची मध्ये केंद्र आणि राज्ये ज्या विषयांवर कायदे करू शकतात असे विषय आहेत. केंद्रात आणि घटक राज्यांमध्ये दोन पातळ्यांवर दोन स्वतंत्र शासन व्यवस्था, लिखीत राज्यघटना, स्वतंत्र न्यायव्यवस्था ही संघराज्यव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये. आकारमानाने मोठ्या आणि सामाजिक, राजकीय, भौगोलिक, आर्थिक, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेल्या देशांसाठी ही व्यवस्था उपयुक्त ठऱते.

Federation - Wikipedia
भारतासारखा रंग जिथे आहे त्या सर्व देशांमध्ये संघराज्य व्यवस्था आहे – उदा. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, ब्राझील, रशिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, पाकिस्तान, सुदान, दक्षिण सुदान, केनिया इत्यादी.

भारतीय राज्यघटनेमध्ये आपातकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तीन प्रकारच्या आणीबाणीची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय आणीबाणी – कलम क्र. ३५२, घटक राज्यामधील आणीबाणी – ज्याला राष्ट्रपती राजवट असेही म्हणतात कलम क्र. ३५६ आणि आर्थिक आणीबाणी कलम क्र. ३६०

भारतात २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती.

आर्थिक आणीबाणी – कलम क्र. ३६०

भारतीय राज्यघटनेच्या कलम क्र. ३६० प्रमाणे आर्थिक आणीबाणी पुकारली जाऊ शकते. आजवर प्रत्यक्षात एकदाही या कलमाचा प्रत्यक्षात वापर करण्यात आलेला नाही.

भारतीय वित्त आयोग

भारतीय संविधानात (कलम क्र. २८०) वित्त आयोगासंबंधीच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. राज्ये आणि केंद्र सरकारच्या वित्तीय व्यवसथेचा आढावा घेऊन त्यांच्यामध्ये करांचे वाटप कसे करावे यांसंबंधीच्या सूचना करणे ही आयोगाची जबाबदारी असते. १९५१ मध्ये पहिल्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. दर पाच वर्षांनी नव्या वित्त आयोगाची स्थापना करण्याची तरतुद संविधानात आहे.

२७ नोव्हेंबर २०१७ रोजी १५व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. साधारणपणे त्याचवेळी १७ ऑग्सट २०१४ मध्ये नियोजन आयोग बरखास्त करून १ जानेवारी २०१५ रोजी जवळपास ६५ वर्षांनी कॅबिनेट रिझोल्युशनच्या माध्यमातून निती आयोगाची स्थापना करण्यात आली तसेच योजनेवरील आणि योजनाबाह्य खर्च (plan and non-plan expenditure) हा फरक काढून टाकण्यात आला आणि जीएसटी (Goods & Services Tax) लागू करण्यात आला. या सर्व बाबींमुळे केंद्र आणि राज्यांमधील वित्तीय संबंधात बरेच मूलभूत स्वरूपाचे बदल झाले आहेत.

कलम क्र. २८०

280. Finance Commission.-

(1) The President shall, within two years from the commencement of this Constitution and thereafter at the expiration of every fifth year or at such earlier time as the President considers necessary, by order constitute a Finance Commission which shall consist of a Chairman and four other members to be appointed by the President.

9th January – Remembering Fatima Sheikh On Her Birth Anniversary - Velivada  - Educate, Agitate, Organize
फातिमा शेख – महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बरोबरीने काम करणाऱ्या १९ व्या शतकातील पहिल्या महिला शिक्षिका

राजकीय पक्ष

राजकीय पक्ष ही लोकशाही व्यवस्थेमधील महत्वाची संस्था आहे. अमेरिकेेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी १९ सप्टेंबर १७९६ रोजी दिलेल्या आपल्या निरोपाच्या भाषणात राजकीय पक्ष लोकांमध्ये दुफळी माजवतात, सत्ता प्राप्त करण्यासाठी बिनबुडाचे मुद्दे उपस्थित करून समाजात संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे लोकशाही व्यवस्थांमध्ये पक्ष निर्माण होणे अटळ असले तरी त्यांनी फार वाव देता उपयोगी नाही असे प्रतिपादन केले आहे. परंतु त्यांच्या हयातीतच अमेरिकेत पक्ष निर्माण झाले आणि त्यांच्यानंतर पक्षांचे महत्त्व तिथे आणि एकूणच लोकशाही जगतात वाढत गेले.

राजकीय पक्ष आणि दबाव गट या दोन वेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत. दबाव गट केवळ एका व्यवसायाच्या किंवा गटाच्या हितांचे रक्षण करतात तर राजकीय पक्ष सर्वांना बरोबर घेऊन व्यवस्था सुरळीत चालेल हे पाहतात. उदा. शरद जोशी यांनी स्थापन केलेली शेतकरी संघटना आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना ही दोन शेतकऱ्यांच्या दबावगटांची उदाहरणे आहेत. भारतीय विद्यार्थी सेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थ्यांच्या संघटना किंवा विद्यार्थ्यांचे दबाव गट आहेत. भारतात बहुतेक दबाव गट कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संलग्न असतात. उदा. भारतीय विद्यार्थी सेना शिवसेनेशी जोडलेली आहे तर ABVP भाजपशी जोडलेली आहे.

राष्ट्रीय सभेची स्थापना

भारतातही लोकशाही व्यवस्था असल्यामुळे राजकीय पक्ष निर्माण होणे अपरिहार्य होते. स्वातंत्र्य मिळण्याआधी १८८५ साली भारतात अॅलन ऑक्टोव्हान ह्यूम यांच्यासारख्या उदारमतवादी ब्रिटीश प्रशासकांच्या पुढाकाराने आणि महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक इत्यादी राष्ट्रीय नेत्यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सभेची (Indian National Congress) स्थापना झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच संस्थेचे रुपांतर आजच्या काँग्रेस पक्षात झाले.

काँग्रेसमधूनच फुटून निघून इतर पक्षांची स्थापना

१९०६ मध्ये ब्रिटीशांच्याच कपटी धोरणानुसार (divide and rule – फोडा आणि राज्य करा) मुस्लीम लीगची स्थापना झाली. त्याला प्रत्युतर म्हणून ज्यांना काँग्रेस हिंदूहीताचे रक्षण करेल असे वाटत नव्हते अशा काही हिंदूंनी त्याचवर्षी हिंदू सभेची स्थापना केली. पुढे १९२१ मध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. त्याच दशकात काँग्रेस पक्षांतर्गत काँग्रेस समाजवादी पक्षाची (Congress Socialist Party) स्थापना झाली. यामध्ये जवाहरलाल नेहरू, राममनोहर लोहीया, जयप्रकाश नारायण, सुभाषचंद्र बोस यांसारखे दिग्गज नेते सामील झाले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंंतर विचारप्रणालीच्या फरकामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या आवाहनामुळे या गटाने म्हणजेच काँग्रेस सोशॅलिस्ट पक्षाने वेगळ्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.

१९२५ साली नागपूरात डॉ. हेडगेवार या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सांस्कृतिक संघटनेची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर संघपरिवाराच्या बांधणीला वेग आला. संघटनेचे राजकीय अंग म्हणून जनसंघ या पक्षाची श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली स्थापना करण्यात आली. १९७५ ते १९७७ या काळात मध्ये भारतात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती. आणीबाणी मागे घेतल्यानंतर १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या. १९७७ मध्ये जनसंघ जयप्रकाश नारायण यांच्या प्रयत्नाने स्थापन झालेल्या जनता पक्षामध्ये विलीन झाला आणि १९८० मध्ये त्यामधून बाहेर पडून भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. राजकीय पक्ष निर्मीतीचा आणि विकासाचा हा सगळा इतिहास रंजक आहे.

राष्ट्रीय पक्ष असलेल्या परंतु पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यांमध्येच अधिक प्रभाव असलेल्या साम्यवादी पक्षाच्या अंतर्गत राजकारणातून पश्चिम बंगालच्या नक्षलबारी विभागात नक्षलवादाचा जन्म झाला. नक्षलवाद्यांचा लोकशाही तत्त्वांवर आणि व्यवस्थेवर विश्वास नाही. ते हिंसेचा पुरस्कार करतात.

राष्ट्रीय पक्ष

भाजप, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडीया तृणमूल काँग्रेस, नॅशनल पिपल्स पार्टी

प्रादेशिक पक्ष

याचप्रकारे प्रत्येक राज्यात प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. सध्या प्रादेशिक पक्षांचे युग आहे असे मानले जाते. महाराष्ट्रात शिवसेना, मनसे – आसाममध्ये आसाम गण परिषद, आंध्रमध्ये तेलगु देशम, तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णा द्रमुक ही प्रादेशिक पक्षांची उदाहरणे आहेत.

अकाली दल हा पंजाबमधील प्रादेशिक पक्ष – शीख समाजाचे प्रतिनिधीत्व करणारा – १९६६ नंतर वेगळे घटक राज्य झाल्यामुळे पंजाबचे वेगळे राजकारण सुरु झाले. त्यामध्ये अकाली दलामध्ये फूट पडावी या हेतूने जर्नेलसिंग भिंद्रनवाले या अतिरेकी नेत्याला प्रोत्साहन दिले गेले. त्यांची ताकद वाढत गेली. त्यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदीरात आपला मुक्काम हलवला आणि तिथून दहशतवादी कारवाया चालू झाल्या. त्या रोखण्यासाठी जून १९८४ मध्ये सुवर्णमंदीरात लष्करी कारवाई करण्यात आली – Operation Blue Star – या कारवाईमध्ये भिंद्रनवाले मारले गेले, परंतु सुवर्णमंदीरातील काही इमारतींना धक्का बसला.

ऑल इंडीया फॉरवर्ड ब्लॉक

“The All India Forward Bloc (AIFB) is a left-wing nationalist political party in India. It emerged as a faction within the Indian National Congress in 1939, led by Subhas Chandra Bose. The party re-established as an independent political party after the independence of India. It has its main stronghold in West Bengal. The party’s current Secretary-General is Debabrata Biswas. Veteran Indian politicians Sarat Chandra Bose (brother of Subhas Chandra Bose) and Chitta Basu had been the stalwarts of the party in independent India” — Summary retrieved on October 7, 2019 http://dbpedia.org/resource/All_India_Forward_Bloc

https://www.loc.gov/item/lcwaN0027417/

आसाम गण परिषद

आसाम मधील प्रादेशिक पक्ष

Operation Blue Star ऑपरेशन ब्ल्यु स्टार

१ जून ते ६ जून १९८४ – अमृतसर, पंजाब येथील सुवर्ण मंदीरात केलेली लष्करी कारवाई

चंदीगड – हरियाणा आणि पंजाब या दोन घटक राज्यांची राजधानी

भारतीय निवडणुक आयोग राजकीय पक्षांचे तीन प्रकार मानतो – राष्ट्रीय, प्रादेशिक आणि नोंदणीकृत जनमान्यता नसलेले (National, Regional and Registered unrecognised parties). या सर्व पक्षांची यादी इथे पहा. अर्थात ती यादी पाहताना त्या लेखात खाली दिलेले संदर्भही तपासून पहा.

कोनराड संगमा

कोनराड संगमा हे मेघालयाचे मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींबरोबर – यांच्या प्रादेशिक पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.
दार्जिलिंग मधील गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे नेते – सुभाष घिशिंग
लालडेंगा – मिझो नॅशनल फ्रंट या मिझोराममधील प्रादेशिक पक्षाचे भूतपूर्व नेते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला सध्याचा पश्चिम बंगालमधील प्रादेशिक पक्ष

नक्षलवाद

कारगील युदध – ३ मे १९९९ ते २६ जुलै १९९९

पनून काश्मीर – काश्मीरी पंडीतांची संघटना

PANUN KASHMIR (meaning our own Kashmir) is a struggle to reconquer that Kashmir which is almost lost.

PANUN KASHMIR is an effort to Save Kashmiri Pandits to Save Kashmir to Save India.

http://www.panunkashmir.org/

यासर अराफत – पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेचे नेते

Palestine Maps & Facts - World Atlas
Map showing location of Palestine in the world.

Lone wolf terrorism

Lone Wolf Terror

Lone-wolf terrorists are those who operate on their own, without the constraints imposed by an organisation with a structured hierarchy and chain of command. They are “self-radicalized individuals who commit violent acts to promote a cause or support a belief system… they appear to be isolated and avoid many of the traditional organizational characteristics used to identify and track traditional terrorist groups”. They pose an increasing threat to the United States and much of Europe, where most terrorist groups lack a structured presence but still possess the ability to radicalise individual members of society through media and the Internet. Though they may not be “official” members of any terrorist organisations, they often draw their inspiration from such groups, mimicking their tactics and claiming them as inspiration for the attacks.

https://www.risetopeace.org/2018/09/22/lone-wolf-terror/kkleinle/

Boko Haram – Terrorist organisation in Nigeria, Africa

बोकोहराम या दहशतवादी संघटनेनी २०१४ मध्ये नायजेरिया मधील चिबॉक शहरामध्ये 276 शालेय मुलींचे अपहरण केले.

https://youtu.be/dsUC72i3kHo

मुअम्मर गड्डाफी – लिबीयाचे भूतपूर्व नेते

म्युनिक ऑलिम्पिक्स हत्याकांड

मुल्ला ओमर – तालिबानची स्थापना

मुल्ला ओमर

म्यानमारमधील रोहींग्यांचा प्रश्न

इस्त्रायलने आपल्या नागरिकांची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका केली

इस्त्रायलचा झेंडा

राजनयिक अधिकारी रविंद्र म्हात्रे यांची हत्या

जेकेएलएफ च्या मकबुल बट्ट ने रविंद्र म्हात्रे यांची लंडन मध्ये १९८४ साली हत्या केली.

ब्लॅक फ्रायडे – १९९३ मुंबई बॉम्ब स्फोटांची कथा

Black Friday: The True Story of the Bombay Bomb Blasts eBook : Zaidi, S  Hussain: Amazon.in: Kindle Store

वेलुपिल्लाई प्रभाकरन – श्रीलंकेमधील तामिळ दहशतवादी गट – लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम चे (एल. टी. टी. ई.) नेते

Tamil leaders in Sri Lanka celebrate LTTE chief Prabhakaran's 63rd birthday  anniversary- The New Indian Express
वेलुपिल्लाई प्रभाकरन – LTTE मुख्यतः श्रीलंकेच्या जाफना प्रांतात कृतीशील होती.

आदी शंकराचार्य

According to one tradition, Shankara was born into a pious Nambudiri Brahman family in a quiet village called Kaladi on the Periyar (Purna) River, Kerala, southern India. He is said to have lost his father, Shivaguru, early in his life. He renounced the world and became a sannyasin (ascetic) against his mother’s will. He studied under Govinda, who was a pupil of Gaudapada. Nothing certain is known about Govinda, but Gaudapada is notable as the author of an important Vedanta work, Mandukya-karika, in which the influence of Mahayana Buddhism—a form of Buddhism aiming at the salvation of all beings and tending toward nondualistic or monistic thought—is evident and even extreme, especially in its last chapter.

https://www.britannica.com/biography/Shankara

“मिळून साऱ्याजणी” विद्या बाळ संपादीत स्त्रीवादी मासिक

Feminist-editor Vidya Bal passes away at 84
श्रीमती विद्या बाळ – “मिळून साऱ्याजणी” च्या संपादिका

‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचा पहिला अंक ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिद्ध झाला. नचिकेत सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर मासिकाचे काम चालायचे. विद्याताई चौथ्या मजल्यावर राहायच्या. आजारपणादरम्यान त्या पहिल्या मजल्यावर राहू लागल्या. दरम्यान, १५ वर्षांपूर्वी मासिकाचे कार्यालय कर्वे रस्त्यावरील भोंडे कॉलनी येथे स्थलांतरित झाले. त्यानंतर विद्याताईंच्या निधनानंतर ते पुन्हा नचिकेत सोसायटीतील पहिल्या मजल्यावर पाच वर्षांच्या करारानुसार सुरू झाल्याने त्यांच्या अस्तित्वाचा दरवळ अनुभवता येत आहे,’ असे मासिकाच्या संपादिका गीताली वि. म. यांनी सांगितले.

महाराष्ट्र टाईम्स मधील लेख

मेधा पाटकर – नर्मदा बचाव आंदोलन

नर्मदा बचाव आंदोलन आणि त्याच्या संस्थापक नेत्या मेधा पाटकर – गुजरातमधील नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पाला विरोध करण्यासाठी प्रामुख्याने हे आंदोलन सुरु झाले.
https://youtu.be/Om0_n-HmBQo

The Immolation of Roop Kanwar

One such incident of sati that has garnered immense attention and spurred a new chain of debates and movements was the case of Roop Kanwar—the last known case of sati in India. On September 4, 1987 Roop Kanwar, an eighteen-year old teen had taken the decision to jump into the funeral pyre of her husband in an act of self- immolation that came to establish a legacy that would live on for years to come. The mass audience who were spectators to this act, described it as a voluntary action. This incident had jolted the state of Rajasthan and spurred a huge human rights campaign countrywide.

Roop Kanwar — Last Known Case Of Sati In India & Its Relevance Today

संदर्भ

१. Allan Octavian Hume, born June 6, 1829, Montrose, Forfarshire, Scot.—died July 31, 1912, London, Eng., British administrator in India, one of the leading spirits in the founding of the Indian National Congress.) – Britannica, T. Editors of Encyclopaedia 2020, July 27.

Allan Octavian Hume. Encyclopedia Britannica.

२. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीचा हा लेख – भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्या असलेल्या प्रिती गांधी यांनी १५ मे २०१४ म्हणजे मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेवर येणार हे जवळपास निश्चित झाल्यावर लिहिलेला लेख. यामध्ये आरएसएस ला बिगर सरकारी संघटना संबोधण्यात आले आहे.

३. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावरील माहितीपट – https://youtu.be/IABqOkI9QUA – प्रसारभारतीच्या युट्यूब चॅनलवर याप्रकारचे बरेच माहितीपट उपलब्ध आहेत.

४. भारतातील आजवरच्या लोकसभा निवडणुका

Loading

Similar Posts