|

A lecture by senior reporter Chetan Nanawre

शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजी कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी श्री. चेतन ननावरे, सिनियर रिपोर्टर, लोकशाही मराठी चॅनल, यांचे “माझा पत्रकारितेचा अनुभव” या विषयावर, प्रथम वर्ष कला शाखेच्या (रुम नं. ४५) वर्गात संध्याकाळी ७ ते ९ या वेळात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

विशेष म्हणजे ते या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. २००५ मध्ये त्यांनी कला शाखेत आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि २००८ साली त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे दोन विषय घेऊन पदवी संपादन केली. २००९ मध्ये त्यांनी सेंट झेवियर्स इन्सिटीट्यूट ऑफ कम्युनिकेशन मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्याच दरम्यान त्यांना सकाळ, मटा., आयबीएन लोकमत इथे प्रशिक्षण मिळाले.

त्यानंतर उमेदवारीच्या काळात त्यांनी दै. लोकमत, पुढारी येथे काम केले. ११ वर्षांच्या या काळात (२००९ ते २०२०) त्यांनी कामगारांच्या अनेक समस्या हाताळल्या. सध्या ते लोकशाही मराठी चॅनल मध्ये सिनियर रिपोर्टर म्हणून काम करत आहेत. त्यांना मंत्रालयाचे बीट देण्यात आले आहे.

त्यांना लोकमत उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे.

आपल्या भाषणात त्यांनी शाळेपासून लोकशाही मराठी चॅनल पर्यंतचा प्रवास कसा झाला त्याचे वर्णन केले. भाषणा दरम्यान प्रत्यक्ष राजकारणातले बरेच अनुभव त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून चर्चेत सहभाग घेतला. पत्रकार कसे व्हायचे हा अनेकांचा प्रश्न होता. कार्यक्रम संपल्यानंतरही बराच वेळ मुलांचा घोळका त्यांच्याभोवती होता – प्रश्नोत्तरे चालू होती.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नागेश सूर्यवंशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते. त्यांच्या हस्ते श्री. ननावरे यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

अधिक माहितीसाठी फेसबुक पेज पहा

Loading

Similar Posts