You are here

Tribals in Maharashtra - आदिवासी चळवळ

आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन

"आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सन १९७२ मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचलनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७६ साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणाकरिता सन १९९२ मध्ये आदिवासी विकास संचलनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले.

आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते."
महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र 3,07,713 चौ.कि.मी.एवढे असून त्यापैकी 50,757 चौ.कि.मी.क्षेत्र आदिवासी उपयोजनेखाली येते. याचे प्रमाण 16.5 टक्के एवढे होते. गेल्या तीन दशकांतील राज्याची लोकसंख्या व आदिवासी लोकसंख्या यांची तुलनात्मक आकडेवारी खाली देण्यात आली आहे.


जनगणना वर्ष	राज्याची एकूण लोकसंख्या (लाखांत)	आदिवासी लोकसंख्या (लाखांत)	टक्केवारी
1971	           504.12	               38.41	     7.62
1981	           627.84	               57.72	     9.19
1991	           789.37	               73.18	     9.27
2001	           968.79	               85.77	     8.85
2011	          1123.74	           105.10	     9.35

Tribal population according to 2011 census was approx. One crore, five lakh ten thousand that means 9.35% of the total population of about 11 crore, 23 lakh 74 thousand

1981-1991 या दशकातील राज्याची एकूण लोकसंख्या व आदिवासी लोकसंख्या यांची तुलना केल्यास असे दिसून येते की, आदिवासी लोकसंख्येच्या वाढीची ही टक्केवारी कमी अधिक प्रमाणात सातत्याने 9.00 ते 9.20 टक्के एवढी राहिलेली आहे. तथपि, 2001 च्या जनगणनेनुसार प्रथमच 9.00 टक्केपेक्षा आदिवासी लोकसंख्या कमी झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत. राज्यात एकूण 35 जिल्हे आहेत आणि आदिवासींची संख्या मोठया प्रमाणात धुळे, नंदूरबार, जळगांव, नाशिक व ठाणे (सहयाद्री प्रदेश) चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती व यवतमाळ (गोंडवन प्रदेश) या पूर्वेकडील वनाच्छादित जिल्हयांमध्ये मुख्यत: अधिक आहे.)

1975-76 या वर्षी भारत सरकारने निर्देश दिल्याप्रमाणे ज्या गांवातील आदिवासी संख्या एकूण लोकसंख्येच्या 50 टक्क्याहून अधिक असेल त्या गांवाचा समावेश एकात्मिकृत आदिवासी विकास प्रकल्पामध्ये (आयटीडीपी) करण्यात आला. भारत सरकारने मान्यता दिलेले अशाप्रकारे 16 प्रकल्प होते. नंतर ज्या गांवामधील आदिवासींची लोकसंख्या 50 टक्केपेक्षा किंचितशी कमी होती. त्या गांवाचा समावेशही अशा एकात्मिकृत आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रामध्ये जमा करण्यात आला आणि अशी क्षेत्रे अतिरिक्त आदिवासी उपयोजना (एटीएसपी गट/प्रकल्प) म्हणून ओळखण्यात येऊ लागली. राज्य शासनाची मान्यता मिळालेली अशी 4 अतिरिक्त आदिवासी उपयोजना प्रकल्प क्षेत्रे आहेत. कालांतराने विखुरलेल्या स्वरुपातील इतर क्षेत्रामधील आदिवासींची संख्या लक्षात घेऊन आणि त्या ठिकाणी चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थांचा विचार करुन या आदिवासी क्षेत्रामधील कामकाज पाहण्यासाठी सध्या एकूण 29 प्रकल्प कार्यालये सुरु करण्यात आली आहेत.

दरम्यान काळात एकात्मिकृत आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रालगतच्या प्रदेशातही काही ठिकाणी आदिवासींची वस्ती असल्याचे निदर्शनास आले. म्हणून सुमारे 10,000 लोकवस्तीच्या गांवामध्ये आदिवासींची संख्या 50 टक्कयाहून अधिक असेल तर अशा गांवाचा समावेश सुधारीत क्षेत्र विकास खंडामध्ये (माडा) करण्यात यावा व एकूण 5,000 लोकवस्तीच्या दोन किंवा तीन गांवामध्ये 50 टक्क्याहून अधिक आदिवासींची संख्या असेल तर, त्या गांवाचा समावेश मिनीमाडा क्षेत्रामध्ये करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण 43 माडा क्षेत्रे आणि 24 मिनीमाडा क्षेत्रे निर्माण करण्यात आली आहेत.

2001 च्या जनगणेनुसार राज्यातील आदिवासीपैकी एकूण सुमारे 49 टक्के आदिवासी आयएडीपी, माडा आणि मिनीमाडा क्षेत्रात राहतात व उर्वरित 51 टक्के आदिवासी या क्षेत्राबाहेर राहतात.

Ministry of Tribal Affairs, Government of India

The Ministry was set up in 1999 after the bifurcation of Ministry of Social Justice and Empowerment with the objective of providing a more focused approach towards the integrated socio-economic development of the Scheduled Tribes (the most underprivileged section of the Indian Society) in a coordinated and planned manner. Before the formation of the Ministry, tribal affairs were handled by different Ministries at different points in time.
Read more about the ministry and its programmes...

World Tribal Day 2019: The Movements of Indigenous People in India

Tribal movements in India have seen various shades from being agrarian and forest-based to being ethnic in nature when tribals directed their revolt against zamindars, moneylenders and even government officials.

Observed on August 9 every year, World Tribal Day or the International Day of the World's Indigenous People is aimed at protecting the rights of the world’s tribal population. The day also recognises the achievements and contributions that indigenous people make to improve world issues such as environmental protection. It was first declared by the United Nations in December 1994 marking the day of the first meeting of the UN Working Group on Indigenous Populations of the Subcommission on the Promotion and Protection of Human Rights, in 1982.

India as a country has seen several tribal movements across Bihar (1772), Andhra Pradesh, Andaman and Nicobar Islands, Arunachal Pradesh, Assam, Mizoram and Nagaland. Tribal movements in India have seen various shades from being agrarian and forest-based to being ethnic in nature, when tribals directed their revolt against zamindars, moneylenders and even government officials.

Read more...

What the Communists want to say about Adivasis?

MAHARASHTRA: WE SHALL FIGHT, WE SHALL WIN
RED FLAG VOWS TO RESIST ATTACKS ON TRIBAL RIGHTS

Thousands of Adivasi men and women started pouring into Azad Maidan in Mumbai from the night of May 18. By next day May 19, 2015, more than 25,000 people had gathered for the first-ever statewide Adivasi rally jointly organised by the Maharashtra state committees of the Adivasi Adhikar Rashtriya Manch (AARM) and Communist Party of India (Marxist). The chief guests at the rally were newly-elected CPI(M) general secretary Sitaram Yechury, MP, newly-elected CPI(M) Polit Bureau member and AIKS general secretary Hannan Mollah, ex-MP, and CPI(M) Lok Sabha MP and former Tripura state minister Jitendra Choudhary.
Read more...

वनवासी कल्याण आश्रम

"Established in 1952 in Jashpur, Madhya Pradesh, Vanvasi Kalyan Ashram is a non profit organisation committed towards upliftment of vanvasi (tribal community) in India.
Vanvasis comprise approximately 10 % of Total Indian Population, Spread practically in all the states & Union Territories. There are 73.18 lakh vanavasis in Maharashtra. They are spread over areas, mainly on hilltops. Bhill, Gond Madia, Katkari, Oraon, Warli are the major tribes. Most of them still follow primitive traditions. All these tribes in the state are mentioned in the state schedule. In Maharashtra there are 47 such scheduled tribes.

The peculiarities which set the Vanvasis, apart from other people are their dresses, traditional adornments, their dialect, folklore and customs. Their life style, traditions, customs, their deities, etc. Everything reflects the primitive traits they harbor. Their children are deprived of any formal education due to their unstable life style. Their lives are fossilized in poverty, superstition and ignorance. They have remained backward economically and socially. A Stigma and criminality is unfortunately attached with this section of society since generations. It was a need of an hour for society to respect Vanvasis and their tribal culture.

With the inspiration from Thakkar Bappa, in the beginning, Vanvasi Kalyan Ashram was established by Mr. Ramakant Keshav a.k.a Balasaheb Deshpande, on 26th December 1952 at Jashpur in Madhya Pradesh by enrolling 6 children of Oraon tribe.

Vanvasi Kalyan Ashram started functioning in Maharashtra in 1979. Shortly a public trust was formed in the name of Vanvasi Kalyan Ashram Maharashtra. (aka VKA). Presently VKA is running 18 hostels for Vanvasi children. Apart from the hostels, there are 3 schools, 3 Nurseries or Balwadis, 113 agriculture development centers, 5 dispensaries, 54 spiritual congregation centers and 804 allied projects are being managed. VKA is also implementing more than 500 social projects through full time dedicated volunteers. The Ashram has presence in 2000 of 5600 Vanvasi villages and hamlets in Maharashtra.

"

महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती

 • वारली
 • गोंड
 • कोरकू
 • मल्हार कोळी
 • कातकरी
 • भिल्ल
 • See the complete list here.

  भामरागडला मिठ वाटण्यासाठी बाबा आमटे जातात आणि तेथे ते मोठे होतात. त्यांना मानसन्मान, धनधान्य विपुल प्रमाणात मिळते. कोसबाडलाही मानसन्मान, धनधान्य विपुल मिळते. ते त्यांना मिळते याचे दुःख नाही. ते त्यांना मिळावे पण कोसबाडच्या टेकडीवर राहणारा आदिवासी, भामरागडचा आदिवासी आहे तिथेच आहे. म्हणजे आदिवासिंमध्ये काम करणारे गैर आदिवासी मोठे होतात आणि आदिवासी मात्र जैसे थे. अगदी जे.पी. सिंधल या चित्रकाराबद्दलही असेच म्हणावे लागेल. त्यांना बस्तरमधील अर्धनग्न व अनावृत्त माडिया तरुनिंची उत्तान चित्रे काढल्याबद्दल आंतरराष्ट्रीय ख्याति मिळते. बस्तरचि आदिवासी स्त्री मात्र जैसे थे आहे. तिच्या डोईवरची मोळी, काखेतले मूल काही खाली उतरले नाही.यासाठी स्थानिक आदिवासी व्यक्तिन्मध्ये नेतृत्त्वगुण वाढीस लागणे महत्त्वाचे आहे.
  Read more...

  “इथे लवकर लग्ने होतात. 18 वर्षे होण्याआधीच मुलगी गर्भवती होते. बाळंतपणात ती कसलाच वेगळा आहार घेत नाही आणि विश्रांतीही नाही. येणारे बाळही कुपोषित असते आणि आईही. पहिले मूल अंगावर पित असतानाच आई पुन्हा गरोदर होते. पहिल्या मुलाला दूध कमी पडतेच, पण गर्भातल्या बाळाचेही कुपोषण होते, त्याच्या मेंदूच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो. तुम्ही पाहिलेली मुले ही अशाच स्थितीत जन्माला आलेली आहेत.”

  Read more...

  कविता क्र.2)
  ●महादेव कोळी समाज

  महादेव कोळी समाज आपला
  बसलाय डोंगरावर
  भाजी नसली तरी खातोय
  कांदा आणिं भाकर

  कित्येक वर्षे निघूनगेली
  आम्ही अजुन तसेच जगतोय
  एक वेळच जेवण जेवून
  एक एक दिवस मोजुन काढतोय

  आपल्या पूर्वजांनी केल
  तेच अजुन अपन करतोय
  दोन चार गाया घेउन
  त्यांचाच माघे फिरत बसतोय

  विकास आपला होणार कधी
  समाज आपला बदलणार कधी
  आम्ही फक् नशिबाला दोष देतोय
  नशिबाच्या नावानेच खड़े
  फोड्तोय

  विचार आपले बदलणार नही
  समाज एकत्र येणार नहीं
  तोपर्यंत आसेच चालणार
  याचाच फायदा दुसरे घेणार

  एकत्र या संघटन करा
  एकजुटिचा विचार करा
  अन्याया विरुद्ध बंडकरा
  तरच शत्रूला बसेल हादरा
  -सीताराम कांबळे
  Read some more poems here...

महाराष्ट्रातील आदिवासी चळवळी आणि स्त्रियांचे योगदान Link to original article - https://www.loksatta.com/ladha-chalvali-andolan-news/tribal-movement-and...

Korkus in Melghat - hindi documentary - https://www.youtube.com/watch?v=V9VdDPs_iiY

photo: 

Fatal error: Class 'Drupal\form_builder\FormBase' not found in /home/content/09/9170209/html/pol/sites/all/modules/form_builder/form_builder.module on line 360