You are here

Global Terrorism - जगभरातील दहशतवाद

Global Terrorism Index

दहशतवाद

थॉमस फ्रिडमन च्या Lexus and the Olive tree या पुस्तकात इस्त्राइल मधील एक उदाहरण दिले आहे. संयुक्त राष्ट्र संघाचा एक अधिकारी इस्त्राइल मध्ये एक शहरातून दुस-या शहरात जात असताना हमरस्त्यावर विश्रांतीसाठी थांबतो. तिथेच त्याचा लॅपटॉप विसरुन तो पुढे जातो. पुढच्या शहरात लॅपटॉप विसरल्याचे लक्षात अल्यावर तो पोलीसांना कळवतो. पोलीसांचा पहिला प्रश्न – किती वेळापूर्वी आपण लॅपटॉप विसरलात? उ. – तासभरापूर्वी. पोलीस त्याला सांगतात – लॅपटॉप मिळेल याची आशा सोडून द्या – म्हणजे तो कोणी चोरलेला नाही हे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो पण BOMB SQUAD ने उडवून टाकला असेल. खारण कोणतीही संशयास्पद वस्तू सापडल्यास लगेच पोलीसात कळवणे व पोलीसांनी तत्परतेने ती निकामी करणे हा नित्यक्रम झाला आहे – दहशतवाद अंगवळणी पडला आहे. मध्य पूर्व किंवा आपण ज्याला पश्चिम आशिया म्हणतो त्या ठिकाणची ही परिस्थिती.

एवढी काळजी घेऊनही तेथे फिदायी दस्त्यांचे आत्मघातकी हल्ले होतातच. भारतात विशेषतः महानगरात या प्रकारचा अनुभव नागरिकांना येवू लागला आहे. १९८० पासून भरतात दहशतवादाचा प्रभाव वाढत गेला. त्याही आधी नक्षलवादी चळवछ अस्तित्वात होती. Power through bullet and not ballot हे त्यांचे ब्रीदवाक्य होते.

दहशतवादी आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी दहशतीच्या तंत्राचा वापर करतात. मुख्यतः सामान्य नागरिकांचे (soft target) बळी घेवून दहशत बसविण्याचा प्रयत्न केला जातो. प्राणहानीमुळे शासनावर दबाव येतो व त्यांना झुकावे लागते. रशियासारखे काही अपवाद वगळले तर बहुतेक ठिकाणी शासनाला माघार घ्यावी लागली आहे. रशियात चेचेन्या भगात काही दहशतवाद्यांनी एका शाळेतील सर्व मुले ओलीस ठेवून घेतली होती. विशिष्ठ मुदतीत मागण्या मान्य केल्या नाहीत तर शाळा उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती परंतु सरकारने त्याआधीच त्या शाळेत कमांडो कारवाई करून सर्व दहशतवादी मारले, दुर्दैवाने बहुतेक सर्व मुलेही मारली गेली. काही दिवसांनंतर त्या मुलांच्या माता राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना जाब विचारण्यासाठी गेल्या – त्यांचे उत्तर होते – दहशतवाद्यांचे लाड करण्याइतका पैसा आपल्या गरीब राष्ट्राकडे नाही, प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी शासन घेवू शकत नाही. दहशतवादाला तोंड देणे शासनाला आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही.

पाकिस्तान, लिबिया सारखी काही राष्ट्रे दहशतवादाचा उघड किंवा छुपा पुरस्कार करतात असा आरोप केला जातो. दहशतवादाच्या सहाय्याने आपली राष्ट्रीय उद्दीष्टे साधणे, शेजारी राष्ट्रांना उपद्रव देणे, हे युद्ध पुकारण्यापेक्षा तुलनेने कितीतरी स्वस्त आहे. शस्त्रास्त्रांचा बेकायदेशीर व्यवहार करणारे आंतरराष्ट्रीय दलाल, अंमली पदार्थांचा व्यापार करणारे जगभर पसरलेले जळे (कोलंबिया हा देश यांचा मुख्य अड्डा मानला जातो.) हे दहशतवादाच्या अर्थशास्त्राचे आधार मानले जातात. शिवाय दहशतवादी छुप्या मार्गाने कार्य करीत असल्यामुळे संबंधीत सहकार्य करणारे राष्ट्र अडचणीत येत नाही – त्याला अधिकृत जबाबदारी झटकून टाकता येते.

जगभरातील या शतकातील दहशतवादी कारवायांचा आढावा घेतल्यास त्याच्या मुळाशी धार्मिक, प्रादेशिक, भाषिक आणि वांशिक अस्मितांचा प्रश्न प्रामुख्याने असल्याचे जाणवते. नक्षलवाद्यांची चळवळ आर्थिक विषमतेतून निर्माण झाली आहे. अनेक वर्षे, पिढ्या अस्मिता दजपल्या गेल्या, आर्थिक, शारिरिक शोषण चालू राहीले, न्याय्य मागण्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही, अथवा सनदशीर मार्गाने प्रश्न सुटणारच नाही अशी खात्री झाल्यावर माणसे दहशतवादाकडे वळतात. संघटना बांधल्या जातात, उद्दीष्टे ठरवली जातात, या संघटनांमध्ये तरुणांची भरती करताना brain washing च्या तंत्राचा प्रभावी पद्धतीने वापर केला जातो. केवळ बेरोजगार तरुणच नाहीतर चांगल्या हुद्द्यावर आणि पगारावर काम करणारी सुखवस्तु बुद्धीजीवी या प्रचारतंत्राला बळी पडतात – आत्मघातकी पथकांमध्ये काम करण्यास बिनदिक्कत तयार होतात.

१९७२ च्या म्युनिच ऑलिंपिक स्पर्धेत Black September या Palestine Liberation Organisation मधून फुटून बाहेर निघालेल्या गटाने इस्त्रायली खेळाडूंवर स्पर्धा चालू असताना हल्ला केला – १६ खेळाडू मारले गेले – Black September च्या नावाचा प्रसार जगभर एक दिवसात एका घटनेमुळे झाला. हे दहशतवाद्यांचे फुकटच्या प्रचाराचे तंत्र – कोणत्याही विशेष खर्चाशिवाय जगभर जाहिरात.

आज जगभरातील दहशतवादाचे केंद्र अरबस्तानात – अमेरिका ज्याला middle east म्हणते किंवा west asia म्हणुन जो भाग ओळखला जातो तिथे आहे असे मानले जाते. इस्त्रायल विरुद्ध इस्लामी राष्ट्रे आणि दहशतवादी संघटना असे त्याचे स्वरुप आहे. इस्त्रायल हे ज्यु धर्मियांची बहुसंख्या असलेले राष्ट्र – त्यामुळे या संघर्षाचे स्वरुप ज्यु विरुद्ध मुस्लिम असे धार्मिकही आहे. ज्यु-इस्लाम-ख्रिश्चन धर्मांमधला संघर्ष प्रचीन युगापासूनचा – त्या धर्मांच्या स्थापनेपासूनचा आहे.

१९४९ पर्यंत यहुद्यांना स्वतःचे राष्ट्र नव्हते. ते जगभर विखूरलेले होते – मुख्यतः युरोपमध्ये. तेथेही त्यांच्याबद्दल तुच्छतेची भावना होती – शेक्सपिअरच्या Merchant of Venice मधील Shylock च्या पात्रामधूनही ही भावना प्रकट होते. २० व्या शतकात हीटलरने या भावनेला मूर्त स्वरुप दिले. ज्युविरोधी वातावरण तापवले, सत्ता प्राप्त केली आणि अधिकृतपणे मोठा नरसंहार घडवून आणला. याचा परिणाम म्हणून आर्थिक दृष्ट्या संपन्न, बौद्धिक दृष्ट्या प्रगत, उद्यमशील ज्यु जमात अमेरिकेत आश्रयाला गेली. तेथे त्यांचा प्रभावी दबावगट निर्माण झाला. त्यांच्या दबावामुळे अमेरिकेने त्यांना पॅलेस्टाईनच्या भूमीवर लष्करी ताकदीच्या आधारावर इस्त्रायल हे राष्ट्र स्थापन करण्यास मदत केली. अनेक मुस्लीम या प्रक्रियेत मारले गेले – त्यातूच इस्लामिक दहशतवादाचा जन्म झाला. अरबी टोळ्यांमध्ये असलेले विशिष्ठ वातावरण दहशतवादी पद्धतीने कार्य करण्यास पोषक होते. नष्ट होण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याजवळ नव्हता – इस्त्रायल आणि अमेरिका हे ब्रिटन सारखे soft state नाहीत. खुद्द अमेरिकेच्या इतिहासातही रेड इंडीयन्सचा प्रचंड आणि अमानुष पद्धतीने केलेला नरसंहार आहेच.

यासर अराफत यांच्या नेतृत्वाखाली PLO ची (Palestine Liberation organization) स्थापना झाली. १९९३ पर्यंत या संघटनेने उघडपणे दहशतवादाचा पुरस्कार केला. PLO मधून फुटून काही गट स्थापन झाले. हेजबुल्ला (शिया) हमास हे गट अस्तित्वात आले.

या सगळ्या वातावरणात खतपाणी घालण्याचा प्रकार अमेरिका आणि रशिया मधील शीतयुद्धाने झाला. संपूर्ण जगावर नियंत्रण मिळविण्याच्या खटाटोपात दोन्ही राष्ट्रांनी अनेक दहशतवादी गटांना जाणिवपूर्वक प्रोत्साहन दिले. अमेरिकेतील (Military industrial complex) खाजगी क्षेत्रातील शस्त्रास्त्र निर्मीती करणा-या उद्योगांचे हीतसंबंध यामध्ये गुंतले होते. जेवढे संघर्ष अधिक तेवढा शस्त्रास्त्रांचा खप आणि म्हणून मागणीत वाढ. पण जेवढा शस्त्रास्त्रांचा शप अधिक तेवढी प्रणहानी जास्त हा माणुसकीचा विचार सोयिस्कर रीत्या विसरला जातो. याच MIC केनडीची हत्या घडवून आणल्याचा आरोप केला जातो. JFK या अलिकडच्या सिनेमामधुनही ही सिद्धांत मांडला आहे. Noam Chomsky हा अमेरिकन विचारवंत America is a leading terrorist state in the world असे विनाकारण म्हणत नाही. America : Freedom to Fascism या वेबसाईटवर अमेरिकेच्या दहशतवादी आणि हिंसक कृत्यांवर प्रकाश टाकला आहे.

दहशतवादाचा आसरा घेऊन अमेरिकन सरकार अनेरिकन नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आणि नागरी स्वातंत्र्यावर बंधने आणु पाहत आहे असा आरोप करण्यात येतो. मे २००८ पर्यंत प्रत्येक अमेरिकन नागरिकाला आपल्या कातडीखाली RFID चीप बसवून घ्यावी लागेल – तसा कार्यक्रम सरकारने जाहीर केला आहे.

मध्य पूर्वेतील दहशतवादाला प्रोत्सहन देण्यामागे अमेरिकेचे तेलासंबंधीचे हीतसंबंध गुंतलेले आहेत ही बाब उघड आहे.

या आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा परिणाम भारतात काश्मीरमध्ये सर्वाधिक जाणवतो. काश्मीरला अर्थातच भारत-पाकिस्तान संबंधांची आणि हिंदु-मुस्लीम संघर्षाची पार्श्वभूमी आहे. शिवय काशमीरी संस्कृती आणि जिवनपद्धतीच्या वेगळेपणाची पार्श्वभूमी आहेच.

पंजाबमधील दहशतवाद थोड्या वेगळ्या स्वरुपाचा आहे. त्याची सुरवात इथल्या विशिष्ठ राजकीय परिस्थितीतून झाली. १९७८-७९ मध्ये कॉंग्रेस पक्षाने अकाली राजकारणाला शह देण्यासाठी भिंद्रनवाले नावाच्या छोट्या गावातील किरकोळ परंतु भडक आणि आगपाखड करणारी भाषा वापरणा-या गुरुद्वारातील ग्रंथीला हाताशी धरले. अल्पावधीतच तो मोठा झाला, कॉंग्रेसच्या नियंत्रणाबाहेर गेला आणि स्वतंत्र खलिस्तान साठीची दहशतवादी चळवळ त्याने सुरु केली. नंतरच्या टप्प्यावर त्यांना पाकिस्तान आणि अमेरिकेतून मदत मिळाली – आजही थोड्या प्रमाणात हा विचार अस्तित्वात आहे.

काश्मीर आणि पंजाबमंतर नक्षलवाद्यांचा विचार करावा लागतो – यांनी बिहार, झारखंड, ओरीसा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या राज्यात ब-यापैकी हातपाय पसरले आहेत. (Red corridor) त्यांचा मुद्दा मुख्यतः आर्थिक शोषणाचा आणि जमिनीच्या फेरवाटपाचा आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही – बंदुकीच्या नळीतूनच सत्तेचा मार्ग जातो या माओच्या विचारावर त्यांचा ठाम विश्वास आहे. परंतु ब-याच ठिकाणी मूळ उद्दीष्टांपासून बाजूला जावून या चळवळीने स्थानिक आदिवासिंना आणि दुर्बल घटकांना वेठीस धरल्याचे चित्र दिसते. ज्या भागात त्यांचा प्रभाव अधिक आहे तेथे भारतीय घटना लागू करता येत नाही, प्रशासनाला कोणतेही कार्य करता येत नाही अशी परिस्थिती आहे. पोलीसांना कॉलसाईनचा वापर केल्याशिवाय एकमेकांशी संवाद करता येत नाही. पोलीसांमध्ये नक्षलवाद्यांचा ब-यापैकी शिरकाव झालेला आहे. (infiltration).

इशान्येकडील राज्यांमध्ये वेगळे प्रश्न आहेत. तेथे प्रत्येक राज्यात स्वतंत्र दहशतवादी संघटना कार्यरत आहेत उदा. Gorkha national liberation front – Darjeeling, Manipur People’s Party – Manipur, Naga Socialist Council – Nagaland, Mizo National Front – Mizoram, Tripura National Volunteers – Tripura, Bodo Mukti morcha – Assam.

[१] काही महत्वाच्या दहशतवादी संघटना पुढीलप्रमाणे –
1. Abu Nidal organization
2. Al Qaeda
3. Aum Shinrikyo
4. Black September
5. Hamas
6. Harkat ul-Ansar
7. Hizbollah
8. Irish Republican Army
9. Islamic Jihad
10. Khmer Rouge
11. Ku Klux Klan
12. Kurdistan worker’s party
13. LTTE
14. Mujahadin
15. Palestine Liberation Organisation
16. Kal Khalsa
17. Kamdami tanksal
18. Neo Nazis
19. Talibaan
20. Naxalites
21. ETA – Basque Nation and Liberty (Spain and France)


Fatal error: Class 'Drupal\form_builder\FormBase' not found in /home/content/09/9170209/html/pol/sites/all/modules/form_builder/form_builder.module on line 360