You are here

MIS - Management Information System - व्यवस्थापकीय माहिती प्रणाली

मी एका आधुनिक सोयींनी युक्त वाचनालयाचा सदस्य आहे. काही कारणास्तव सहा महिने वाचनालयात जाऊ शकलो नाही. सहा महिन्यांनंतर वाचनालयात गेलो तेव्हा लक्षात आले की पुस्तक देण्या घेण्याचे काम करणारा कर्मचारी बदलला आहे. मी त्याला पुस्तक परत केले, त्याने ते स्कॅन केले आणि त्याचे संभाषण सुरु झाले. सर तुम्ही सहामहिन्यांनंतर वाचनालयात आला आहात. सहा महिन्यांपूर्वी तुम्ही हे पुस्तक नेले होते. ते वेळेवर परत न केल्यामुळे त्यासंबंधीचा इतका दंड तुम्हाला भरावा लागेल. दंड भरला, लगेच पावती मिळाली आणि तो म्हणाला आता तुम्हाला परत नव्याने पुस्तके घेता येतील. मी संगणकावर पुस्तकाचा शोध घेतला. ते उपलब्ध आहे असा उल्लेखही तिथे होता. संबंधीत पुस्तक हवे आहे अशी नोंद करताच काही मिनिटात पुस्तक हजर झाले.

अत्याधुनिक ग्रंथालयातील पुस्तक घेण्याचा व्यवहार दाखवणारा हा व्हिडिओ पहा.

See the book vending machine here

फेसबुकवर तुमच्या मित्रांची यादी आहे. प्रत्येक मित्राचा वाढदिवस कधी आहे त्याची महिनावार यादी तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे काही कार्यक्रमाची आखणी करू शकता. भेटी ठरवू शकता. या भेटींमुळे तुमचे संबंध अधिक चांगले होतील आणि त्याचा तुम्हाला काही फायदा होईल. फेसबुकवर खूप अॅक्टीव असणाऱ्या तुमच्या एखाद्या मित्राचे फेसबुक पेज सविस्तर पाहिले तर गेल्या महिनाभरात त्याने काय केले, त्याच्य आवडीनिवडी काय आहेत, त्याचा साधारण स्वभाव कसा असेल यासंबंधी तुम्ही काही अंदाज बांधू शकता.

दिवसाचे, आठवड्याचे किंवा महिन्याचे वेळापत्रक तुम्ही तुमच्या मोबाईलवर कॅलेंडर मध्ये सेव्ह करू शकता. योग्य वेळेस आठवण करून देण्याचे काम मोबाईल न चूकता करतो. एक प्रकारे तो तुमच्या पर्सनल सेक्रेटरीचे काम करतो.

अॅमेझॉन किंवा कुठल्याही ऑनलाईन बुकशॉपवर पुस्तक खरेदी करताना तुम्हाला येणारा अनुभव आठवा - तुम्ही एखादे पुस्तक शोधण्यासाठी त्याचे नाव टाकल्यावर त्या पुस्तकाबरोबर इतर अनेक पुस्तकांचे संदर्भही दिसतात. नेमके पुस्तक निवडल्यावर त्या पुस्तकासंबंधीच्या लोकांच्या प्रतिक्रिया आणि परिक्षणे तुम्हाला वाचता येतात. हे पुस्तक ज्यांनी विकत घेतले आहे त्यांनी आणखी कोणती पुस्तके पाहिली अथवा विकत घेतली हे पाहता येते. मागच्या काही दिवसात तुम्ही अॅमेझॉनवर कशाकशाचा शोध घेतला हेही तुम्हाला पाहता येते.

कुरियर कंपन्या कुरियर ट्रॅक करण्याची सुविधा देतात. ट्रॅकींग संबंधीचे हे इमेल पहा:-

12 ते 17 सप्टेंबर पर्यंतचा पार्सलचा सर्व प्रवास - तारीख, वेळ, काय घडले आणि कुठे घडले या सर्व माहितीसकट - सहा दिवस, तीन देश आणि सहा शहरातील हा प्रवास - व्यवस्थापकीय माहिती प्रणाली ही बदलती माहिती सतत नोंदवर राहते आणि ग्राहकांना कळवत राहते.

Tracking results as of Sep 17, 2016 6:24a GMT
Date/Time Activity/Location
9/17/2016 2:16 am Departed FedEx location GURGAON IN
9/17/2016 1:23 am In transit GURGAON IN
9/17/2016 12:37 am In transit GURGAON IN
9/16/2016 11:50 pm Arrived at FedEx location GURGAON IN
9/16/2016 9:48 pm Departed FedEx location NEW DELHI IN
9/16/2016 6:05 pm In transit NEW DELHI IN
9/16/2016 5:16 pm In transit NEW DELHI IN
9/16/2016 8:29 am International shipment release - Import NEW DELHI IN
9/14/2016 6:27 pm Clearance delay - Import NEW DELHI IN
9/14/2016 4:48 pm In transit NEW DELHI IN
9/14/2016 8:57 am Clearance delay - Import MUMBAI IN
9/14/2016 3:37 am Departed FedEx location ROISSY CHARLES DE GAULLE CEDEX FR
9/14/2016 2:33 am In transit ROISSY CHARLES DE GAULLE CEDEX FR
9/14/2016 1:19 am Arrived at FedEx location ROISSY CHARLES DE GAULLE CEDEX FR
9/13/2016 10:06 pm Left FedEx origin facility GATESHEAD GB
9/13/2016 9:16 pm Departed FedEx location ROISSY CHARLES DE GAULLE CEDEX FR
9/13/2016 5:31 pm In transit PAISLEY GB
9/13/2016 5:31 pm Left FedEx origin facility PAISLEY GB
9/13/2016 5:30 pm In transit PAISLEY GB
9/13/2016 5:30 pm Left FedEx origin facility PAISLEY GB
9/13/2016 4:06 pm Picked up PAISLEY GB
9/12/2016 2:54 am Shipment information sent to FedEx

रेल्वेचे तिकीट आरक्षित करताना आपण वापरतो ती व्यवस्थापकीय माहिती प्रणालीच असते. गाडी, तारीख, वेळ, प्रवास वर्ग, उपलब्ध जागा, किंमत ही सर्व माहिती क्षणाक्षणाला बदलत राहते. त्यानुसार आपण आपले निर्णय घेऊ शकतो. जगभरातून होणाऱ्या आरक्षणासंबंधीची आकडेवारी पाहिल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना आरक्षणाच्या एकूण प्रक्रियेमधील अडचणी समजतात. त्या माहितीच्या आधारे ते आरक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासंबंधीचे निर्णय घेऊ शकतात.

काही मोठ्या शहरातील सिनेमा शो आरक्षित करण्याची सोय काही मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. हे MIS चे आणखी एक उत्तम उदाहरण.

ऑनलाईन बँकींग, ऑनलाईन शेअर व्यवहार ही आणखी काही उदाहरणे.

ही तुमच्या आमच्या रोजच्या जीवनातील व्यवस्थापकीय माहिती प्रणालींची उदाहरणे.

मोठ्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची सर्व माहिती संगणकावर साठवलेली असते. ती माहिती सतत अपडेट केली जाते - सतत बदलत राहते. सर्वात प्रथम या रुग्णाला दाखल करून घेता येईल की नाही हे ठरविण्याचा प्रश्न निर्माण होतो - उपलब्ध जागा, रुग्णाचा आजार आणि त्याची अवस्था, त्यावर उपचार होऊ शकेल की नाही, रुग्णाला होणारा खर्च परवडणारा आहे का इ्त्यादी संबंधीत प्रश्नही निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थापकीय माहिती प्रणाली सहज देऊ शकतात. या प्रणाली मध्ये एकूण खाटांची आणि खोल्यांची संख्या नोंदविलेली असते तसेच उपलब्ध खाटांची अद्ययावत माहितीही मिळते. स्वागत कक्षामधील कर्मचारी त्या माहितीच्या आधारे रुग्णांना योग्य मार्गदर्शन करू शकतात. रुग्णाची नोंद केल्यावर संबंधीत डॉक्टरला त्याची माहिती मिळते आणि तो पुढील कारवाई करतो. लेखा विभागात रुग्णांची बीले तयार केली जातात आणि ती वेळेवर भरली जात आहेत की नाही यांचीही नोंद ठेवली जाते. रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या रुग्णालयात किती खाटा आहेत, किती आणि कोणत्या प्रकारचे रुग्ण आहेत, डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी किती, वैद्यकीय आणि इतर उपकरणे किती, होणारा खर्च, मिळणारे उत्पऩ्न या सर्वाची माहिती क्षणार्धात एकाच ठिकाणी मिळू शकते. त्यानुसार ते रुग्णालयासंबंधीचे आपले धोरण ठरवू शकतात.

अशीच रोजच्या जीवनातील अनेक उदाहरणे देऊन एम. आय. एस. म्हणजे काय ते समजावून सांगणारा हा व्हिडीओ पहा.

मोबाईल फोनच्या रेकॉर्डवरून गुन्ह्याची उकल करणे आणि गुन्हेगार शोधून काढणे हे अगदी नित्याचे झाले आहे.

पॅन, आधार या ओळखपत्रांच्या सहाय्याने एखाद्या व्यक्तीचा मागोवा घेणे सरकारी संस्थांना अगदी सहज शक्य झाले आहे. आयकर विभाग नागरिकांच्या आर्थिक उलाढालींवर लक्ष ठेवून नेमकी कारवाई करू शकतो. कारवाईसाठी आवश्यक ती सर्व माहिती आणि पुरावे त्यांना एका क्लिकवर सहज उपलब्ध होते. गेल्या वर्षभरात किती नागरिकांनी 50,000 रुपयांच्या वरचे किती व्यवहार कुठल्या शहरात केले याची माहिती आयकर विभागाला सहज उपलब्ध होऊ शकते.

शेअर बाजाराच्या सर्व व्यवहारांवर सेबी याच प्रकारे लक्ष ठेवू शकते.

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची नोंद इमिग्रेशन विभागकडे केली जाते. त्यावरून वर्षाच्या शेवटी कोणत्या देशातून किती पर्यटक आले, त्यांनी भारतात कुठे भेटी दिल्या ही सर्व माहिती सरकारला मिळू शकते. पर्यटनाचा विकास करण्यासाठी या माहितीचा उपयोग केला जातो.

MIS संगणक आणि नेटवर्क वर आधारित आहे. 1940 पासून संगणकाचा विकास सुरु झाला. 1950 पासून MIS ची चर्चा सुरु झाली. आज प्रत्येक उद्योगासाठी आणि शासनासाठी MIS ही अत्यावश्यक व्यवस्था होऊन बसली आहे. या प्रणालींमध्ये सतत विविध ठिकाणांवरून, विविध माणसांकडून आणि विविध प्रकारची माहिती गोळा केली जाते. ती माहिती गोळा करताना अधिकात अधिक अचूक असेल हे पाहण्यासाठी संबंधीत सॉफ्टवेअर मध्ये विशेष तरतूदी केलेल्या असतात. त्यानंतर त्या माहितीवर प्रक्रिया केली जाते. समजण्यास सोप्या अशा पद्धतीने विविध प्रकारे ही माहिती प्रसारित केली जाते.

Read these articles about MIS:-

  1. http://deepread.blogspot.in/2011/06/mis-and-decision-making-concepts.html
  2. MIS article from Boston University, Metropolitan College
  3. https://www.youtube.com/watch?v=qiLXJ0lhN2g - YouTube Video
  4. https://www.youtube.com/watch?v=593SYDzCUXg - another video - lucid discussion
  5. CEC UGC video - https://www.youtube.com/watch?v=BFrv4ru9XDk about one hour talk

Fatal error: Class 'Drupal\form_builder\FormBase' not found in /home/content/09/9170209/html/pol/sites/all/modules/form_builder/form_builder.module on line 360