SEMESTER II
SUB-TITLE: INDIAN POLITICAL PROCESS
1. CHANGING NATURE OF FEDERAL SYSTEM
1.1 CENTRE-STATE RELATIONS WITH REFERENCE TO FISCAL AND EMERGNCY POWERS.
1.2 DEMAND FOR GREATER AUTONOMY
1.3 CHANGING DYNAMICS OF CENTRE-STATE RELATIONS
2. PARTY POLITICS AND ELECTIONS
2.1 NATIONAL PARTIES - FEATURES
2.2 REGIONAL PARTIES – CHARACTERISTICS
2.3 ANALYSIS OF ELECTORAL PERFORANCE OF NATIONAL AND REGIONAL PARTIES SINCE 1989.
3. SOCIAL DYNAMICS
3.1 CASTE (WITH REFERENCE TO RESERVATION)
3.2 RELIGION (WITH REFERENCE TO COMMUNALISM)
3.3 GENDER (WITH REFERENCE TO POLITICAL PARTICIPATION)
4. CHALLENGES TO NATIONAL SECURITY
4.1 CRIMINALISATION OF POLITICS
4.2 INTERNAL THREATS TO SECURITY (WITH REFERENCE TO
NAXALISM AND INSURGENCY)
4.3 GLOBAL TERRORISM
आर्थिक आणि आणिबाणीच्या अधिकारांच्या संदर्भात केंद्र राज्य संबंध
अधिक स्वायत्ततेची मागणी
केंद्र राज्य संबंधांचे बदलते स्वरुप
राष्ट्रीय पक्ष – वैशिष्ट्ये
प्रादेशिक पक्ष – वैशिष्ट्ये
१९८९ पासूनच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या निवडणुकीतील कामगिरीचे विश्लेषण
जात (आरक्षणाच्या संदर्भात)
धर्म (जमातवादाच्या संदर्भात)
स्त्री-पुरुष समानता (राजकीय सहभागाच्या संदर्भात)
राजकारणाचे गुन्हेगारीकरण
सुरक्षेला असलेले अंतर्गत धोके (नक्षलवाद आणि बंडखोरीच्या संदर्भात)
जागतिक दहशतवाद
SUGGESTED READINGS:
1. Abbas, H., Kumar, Ranjay, and Alam, Mohammad Aftab, Indian Government and Politics, Pearson, 2011.
2. Chakravarty, Bidyut, and Pande, Rajendra Kumar, Indian Government and Politics, Sage Publications, 2008.
3. Chandoke, Neera, and Priyadarshi, Praveen, Contemporary India, Pearson, 2009.
4. Ghosh, Peu, Indian Government and Politics, PHI, 2012.
5. Jayal, Nirja G., and Mehta, BhanuPratap, The Oxford Companion to Politics in India, OUP, 2011.
6. Jha, Pravin Kumar, Indian Politics in Comparative Perspective, Pearson, 2012.
7. Paranjpe,Shrikant,India’s Internal Security:Issues and Perspectives, Kalinga Publications, 2009.
8. Singh, M. P., and Saxena, Rekha, Indian Politics, PHI, 2011.
9. कुलकर्णीबी. वाय., भारतीयशासनआणिराजकारण, विद्याप्रकाशन, २००८.
10. पाटील, बी. बी., भारतीयशासनआणिराजकारण, फडकेप्रकाशन, २०१०.
11. पाटीलव्ही. बी., भारतीयराज्यव्यवस्था, के. सागर, २०११.
12. पित्रे, शशिकांन्त, डोमेलतेकारगिल, राजहंसप्रकाशन, २०००.
13. भुरे, रश्मी, शांततेच्याशोधातकाश्मिरीतरुण, श्रीविद्याप्रकाशन, २००९.
Marks 100 . Duration 3 hours.
Total 5 questions with internal options for each question.
20 marks for each question.
Q. no. 1 to 4 on topic no. 1 to 4, respectively - 20 marks for each question.
Q. no. 5 - Write short notes - any two out of four - each short note has 10 marks.
All questions are compulsory.
Q. 1a - 20 marks
or
Q. 1b - 20 marks
Q. 2a - 20 marks
or
Q. 2b - 20 marks
Q. 3a - 20 marks
or
Q. 3b - 20 marks
Q. 4a - 20 marks
or
Q. 4b - 20 marks
Q. 5 - Write short notes (any two) - 20 marks
a.
b.
c.
d.
Changing nature of the federal system
Read this excellent slide show about federal systems around the world. A PDF copy of this slideshow is attached below.
भारतीय राजकीय प्रक्रिया (२०१६-१७ पासूनचा अभ्यासक्रम)
संघराज्य पद्धतीचे बदलते स्वरुप
संघराज्य म्हणजे काय ?
घर - वस्ती - गाव - तालुका - शहर - जिल्हा - राज्य - देश - खंड - जग
संघराज्य - मोठ्या देशांसाठी उपयुक्त व्यवस्था
भारतीय राज्यघटनेच्या ११ व्या भागात केंद्र राज्य संबंधांविषयी सविस्तर तरतूदी करण्यात आल्या आहेत.
कलम क्रं ३५२ ते ३६० मध्ये आणीबाणीविषयक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय आणीबाणी - ३५२
राज्यांमधील आणीबाणी - राष्ट्रपती राजवट - ३५६
आर्थिक आणीबाणी - ३६०
प्रश्न
संघराज्य व्यवस्थेचे बदलते स्वरूप
जगाची आणि देशांची रचना – विविध पातळ्यांवरील नियंत्रक संस्था
तुम्ही कोठे राहता?
प्रत्येक घरामध्ये भाषा, जीवनपद्धती, आर्थिक स्थिती, शैक्षणिक दर्जा, जात, धर्म, वय, सदस्य संख्या, स्त्री-पुरुष प्रमाण यानुसार फरक असतो.
साधारणतः एका खेड्यात एकच भाषा बोलली जाते. खेड्यांमध्ये जातीनुसार घरांची रचना – ब्राह्ण आळी, माळी गल्ली, महारवाडा, मांगवाडा.
मुंबईमध्ये संमिश्र वस्ती असली तरी प्रांत, भाषा, धर्म आणि काही ठिकाणी जातीनुसार वस्ती. उदा. बेहरामपाडा – मुस्लीम, गिरगाव – ब्राह्मण, माटुंगा – दक्षिण भारतीय, सांताक्रुझ – उत्तर भारतीय, बोरिवली – गुजराती, भेंडी बाजार – मुस्लीम, बांद्रा पश्चिम – ख्रिश्चन, चेंबूर – सिंधी, दक्षिण भारतीय.
प्रत्येक घरांमध्ये फरक असला तरी त्यांना एकत्र बांधणाऱ्या गोष्टी असतात. उदा. भाषा, धर्म, जात.
भारतात भाषेच्या आधारावर स्वतंत्र घटक राज्ये निर्माण करावीत अशी मागणी होती. इंग्रज इथे येण्यापूर्वी सर्व प्रदेश एका सत्ताकेंद्राच्या हाती कधीच नव्हता. तो अनेक संस्थानांमध्ये विभागलेला होता. उदा. कोल्हापूर संस्थान, सांगली संस्थान, भोर संस्थान, हैद्राबादचा निजाम, जुनागढ, आदिलशहा, कुतुबशहा, बंगालचा नबाब, काश्मीर संस्थान इत्यादी. भारत स्वतंत्र झाला तेव्हा जवळपास ५६० संस्थाने अस्तित्वात होती.
ब्रिटीशांनी सर्व भारतीय प्रदेश एकछत्री अंमलाखाली आणला परंतु त्यांनी बहुभाषिक प्रांत निर्माण केले.
Thirteen ruling parties in all Indian states and union territories -
(Seven Union territories - only two have separate legislature - five ruled by Central government)
Green - other parties (1)AAP in Delhi, (2)Trinamool Congress in West Bengal, (3)Telugu Desham in Andhra Pradesh, (4)Telangana Rashtra Samiti in Telengana, (5)Biju Janata Dal in Odisha, (6)BJP + PDF+ in Jammu and Kashmir, (7) Sikkim - Sikkim Democratic Front, (8) Nagaland - Naga People's Party (friendly relations with BJP) (9) Tamil Nadu - AIADMK (10) Bihar - Janata Dal United
Saffron - BJP - (11 to 23) Maharashtra, Gujarat, Madhya Pradesh, Uttar Pradesh, Uttaranchal, Haryana, Chattisgarh, Rajasthan, Jharkhand, Manipur, Assam, Arunachal Pradesh, Goa
Blue - Congress - (24 to 29) Karnataka, Punjab, Himachal Pradesh, Pondicherry, Mizoram, Meghalaya
Red - Communist Party of India (Marxist) - (30, 31) Kerala, Tripura
White - Union territories - (32 to 36) Chandigarh, Andaman and Nicobar Islands, Lakshadweep, Daman, Dadra and Nagar Haveli - Delhi and Pondicherry have elected state governments though both are Union Territories.
Source - By Indopug - File:Indian states according to party of their chief minister.png, CC BY 4.0,
North East Democratic Alliance formed by BJP after its victory in Assam in 2016
भारतात निवडणुक आयोगाच्या नियमांनुसार तीन प्रकारचे राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत :-
राष्ट्रीय पक्ष
प्रादेशिक पक्ष
नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्ष
भारतीय निवडणुक आयोग नियमीत पणे वरील तिन्ही प्रकारच्या पक्षांची यादी प्रसिद्ध करीत असतो. मार्च 2019 मध्ये प्रसिद्ध केलेली यादी येथे पहा.
पक्षांच्या निवडणुकांमधील कामगिरीप्रमाणे त्यांचे स्थान बदलत राहते. कोणत्या पक्षाला कोणता दर्जा द्यायचा त्यासंबंधीचे नियम येथे पहा.
General elections 2019 - India Map
Wikipedia artile about General elections 2019
भारतामध्ये लोकशाही व्यवस्था असल्यामुळे साम्यवादी किंवा हुकूमशाही व्यवस्थांमध्ये असतात तशी राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी कोणतीही विशेष बंधने नाहीत.
भारतामध्ये भाषा, धर्म, संस्कृती, आर्थिक स्थिती, भौगोलिक स्थिती, इतिहास या सगळ्या आधारांवर प्रचंड विविधता आहे. अलिकडे समाजमाध्यमांचा प्रसार आणि
इतर अनेक बाबींमुळे आम जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झालेली दिसेत. समविचारी लोकांचे अनेक गट निर्माण होतात, त्यांच्यामध्ये सत्ता प्राप्त करण्याची
महत्वाकांक्षा निर्माण होते आणि ते राजकीय पक्ष स्थापन करतात. बऱ्याच वेळा प्रस्थापित पक्षांमधील असंतुष्ट आपला वेगळा पक्ष स्थापन करतात. जनता दल या एकसंध
राष्ट्रीय पक्षामध्ये फूट पडून अनेक प्रादेशिक पक्ष तयार झाले. उदा. ओडीशा मध्ये बिजू जनता दल, बिहारमधील लालू प्रसाद यादव यांनी स्थापन केलेले राष्ट्रीय जनता दल,
कर्नाटक मध्ये देवेगौडांचे वर्चस्व असलेला जनता दलाचा विभाग, शिवसेनेमधून बाहेर पडून निर्माण झालेली महाराष्ट्र नव निर्माण सेना, रिपब्लीकन पक्षाचे अनेक गट इत्यादी.
पक्षांची स्थिती आणि संख्या सतत बदलत असते. भारतीय निवडणुक आयोगाच्या काही नियमांप्रमाणे भारतात तीन प्रकारचे राजकीय पक्ष आहेत.
किती राज्यांमधून किती मतदारांचा पाठिंबा आहे त्या आधारावर प्रत्येक पक्षाचा प्रकार ठऱतो.
काही पक्षांना राष्ट्रीय पक्ष व्हायचे असते. काही एखाद्या प्रदेशापुरते मर्यादीत असतात तर काही नवीन पक्षांना आपले
अस्तित्व टिकवण्यासाठी बरीच धडपड करावी लागते. त्यांना प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात.
राजकीय स्थिती सतत बदलत असल्यामुळे लोकांची मते बदलतात आणि पक्षांचा जनाधार विस्तारतो किंवा कमी होतो. त्याप्रमाणे निवडणुक आयोग
वेळोवेळी वर उल्लेख केलेल्या तीन प्रकारच्या पक्षांच्या याद्या प्रसिद्ध करत असतो. या पानावर मार्च 2019 पासूनच्या सर्व याद्या तुम्हाला पहायला मिळतील.
अर्थात जी सर्वात नवीन यादी असेल तीच त्यावेळची अधिकृत यादी समजली जाते.
https://eci.gov.in/files/category/11-press-releases/ - Press releases by Election Commission of India
Voter services - https://eci.gov.in/voter/voter-services/
Registration of political parties - https://eci.gov.in/candidate-political-parties/political-parties-registr...
Current list of political parties - https://eci.gov.in/candidate-political-parties/list-of-political-parties/
Read detailed article in Marathi here
Parliament on Thursday passed a Constitution amendment bill to extend quota to SCs and STs in Lok Sabha and state assemblies by another 10 years with Law Minister Ravi Shankar Prasad asserting that the Modi government will never stop the reservation system.
Extension of reservation for 10 more years - https://www.indiatoday.in/india/story/parliament-passes-bill-to-extend-s... (If the link is not working see PDF file attached below)
Wikipedia article about denotified tribes - https://en.wikipedia.org/wiki/Denotified_Tribes
दहशतवाद
थॉमस फ्रिडमन च्या Lexus and the Olive tree या पुस्तकात इस्त्राइल मधील एक उदाहरण दिले आहे. संयुक्त राष्ट्र संघाचा एक अधिकारी इस्त्राइल मध्ये एक शहरातून दुस-या शहरात जात असताना हमरस्त्यावर विश्रांतीसाठी थांबतो. तिथेच त्याचा लॅपटॉप विसरुन तो पुढे जातो. पुढच्या शहरात लॅपटॉप विसरल्याचे लक्षात अल्यावर तो पोलीसांना कळवतो. पोलीसांचा पहिला प्रश्न – किती वेळापूर्वी आपण लॅपटॉप विसरलात? उ. – तासभरापूर्वी. पोलीस त्याला सांगतात – लॅपटॉप मिळेल याची आशा सोडून द्या – म्हणजे तो कोणी चोरलेला नाही हे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो पण BOMB SQUAD ने उडवून टाकला असेल. खारण कोणतीही संशयास्पद वस्तू सापडल्यास लगेच पोलीसात कळवणे व पोलीसांनी तत्परतेने ती निकामी करणे हा नित्यक्रम झाला आहे – दहशतवाद अंगवळणी पडला आहे. मध्य पूर्व किंवा आपण ज्याला पश्चिम आशिया म्हणतो त्या ठिकाणची ही परिस्थिती.
एवढी काळजी घेऊनही तेथे फिदायी दस्त्यांचे आत्मघातकी हल्ले होतातच. भारतात विशेषतः महानगरात या प्रकारचा अनुभव नागरिकांना येवू लागला आहे. १९८० पासून भरतात दहशतवादाचा प्रभाव वाढत गेला. त्याही आधी नक्षलवादी चळवछ अस्तित्वात होती. Power through bullet and not ballot हे त्यांचे ब्रीदवाक्य होते.
दहशतवादी आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी दहशतीच्या तंत्राचा वापर करतात. मुख्यतः सामान्य नागरिकांचे (soft target) बळी घेवून दहशत बसविण्याचा प्रयत्न केला जातो. प्राणहानीमुळे शासनावर दबाव येतो व त्यांना झुकावे लागते. रशियासारखे काही अपवाद वगळले तर बहुतेक ठिकाणी शासनाला माघार घ्यावी लागली आहे. रशियात चेचेन्या भगात काही दहशतवाद्यांनी एका शाळेतील सर्व मुले ओलीस ठेवून घेतली होती. विशिष्ठ मुदतीत मागण्या मान्य केल्या नाहीत तर शाळा उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती परंतु सरकारने त्याआधीच त्या शाळेत कमांडो कारवाई करून सर्व दहशतवादी मारले, दुर्दैवाने बहुतेक सर्व मुलेही मारली गेली. काही दिवसांनंतर त्या मुलांच्या माता राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना जाब विचारण्यासाठी गेल्या – त्यांचे उत्तर होते – दहशतवाद्यांचे लाड करण्याइतका पैसा आपल्या गरीब राष्ट्राकडे नाही, प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची जबाबदारी शासन घेवू शकत नाही. दहशतवादाला तोंड देणे शासनाला आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही.
पाकिस्तान, लिबिया सारखी काही राष्ट्रे दहशतवादाचा उघड किंवा छुपा पुरस्कार करतात असा आरोप केला जातो. दहशतवादाच्या सहाय्याने आपली राष्ट्रीय उद्दीष्टे साधणे, शेजारी राष्ट्रांना उपद्रव देणे, हे युद्ध पुकारण्यापेक्षा तुलनेने कितीतरी स्वस्त आहे. शस्त्रास्त्रांचा बेकायदेशीर व्यवहार करणारे आंतरराष्ट्रीय दलाल, अंमली पदार्थांचा व्यापार करणारे जगभर पसरलेले जळे (कोलंबिया हा देश यांचा मुख्य अड्डा मानला जातो.) हे दहशतवादाच्या अर्थशास्त्राचे आधार मानले जातात. शिवाय दहशतवादी छुप्या मार्गाने कार्य करीत असल्यामुळे संबंधीत सहकार्य करणारे राष्ट्र अडचणीत येत नाही – त्याला अधिकृत जबाबदारी झटकून टाकता येते.
जगभरातील या शतकातील दहशतवादी कारवायांचा आढावा घेतल्यास त्याच्या मुळाशी धार्मिक, प्रादेशिक, भाषिक आणि वांशिक अस्मितांचा प्रश्न प्रामुख्याने असल्याचे जाणवते. नक्षलवाद्यांची चळवळ आर्थिक विषमतेतून निर्माण झाली आहे. अनेक वर्षे, पिढ्या अस्मिता दजपल्या गेल्या, आर्थिक, शारिरिक शोषण चालू राहीले, न्याय्य मागण्यांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही, अथवा सनदशीर मार्गाने प्रश्न सुटणारच नाही अशी खात्री झाल्यावर माणसे दहशतवादाकडे वळतात. संघटना बांधल्या जातात, उद्दीष्टे ठरवली जातात, या संघटनांमध्ये तरुणांची भरती करताना brain washing च्या तंत्राचा प्रभावी पद्धतीने वापर केला जातो. केवळ बेरोजगार तरुणच नाहीतर चांगल्या हुद्द्यावर आणि पगारावर काम करणारी सुखवस्तु बुद्धीजीवी या प्रचारतंत्राला बळी पडतात – आत्मघातकी पथकांमध्ये काम करण्यास बिनदिक्कत तयार होतात.
१९७२ च्या म्युनिच ऑलिंपिक स्पर्धेत Black September या Palestine Liberation Organisation मधून फुटून बाहेर निघालेल्या गटाने इस्त्रायली खेळाडूंवर स्पर्धा चालू असताना हल्ला केला – १६ खेळाडू मारले गेले – Black September च्या नावाचा प्रसार जगभर एक दिवसात एका घटनेमुळे झाला. हे दहशतवाद्यांचे फुकटच्या प्रचाराचे तंत्र – कोणत्याही विशेष खर्चाशिवाय जगभर जाहिरात.
आज जगभरातील दहशतवादाचे केंद्र अरबस्तानात – अमेरिका ज्याला middle east म्हणते किंवा west asia म्हणुन जो भाग ओळखला जातो तिथे आहे असे मानले जाते. इस्त्रायल विरुद्ध इस्लामी राष्ट्रे आणि दहशतवादी संघटना असे त्याचे स्वरुप आहे. इस्त्रायल हे ज्यु धर्मियांची बहुसंख्या असलेले राष्ट्र – त्यामुळे या संघर्षाचे स्वरुप ज्यु विरुद्ध मुस्लिम असे धार्मिकही आहे. ज्यु-इस्लाम-ख्रिश्चन धर्मांमधला संघर्ष प्रचीन युगापासूनचा – त्या धर्मांच्या स्थापनेपासूनचा आहे.
१९४९ पर्यंत यहुद्यांना स्वतःचे राष्ट्र नव्हते. ते जगभर विखूरलेले होते – मुख्यतः युरोपमध्ये. तेथेही त्यांच्याबद्दल तुच्छतेची भावना होती – शेक्सपिअरच्या Merchant of Venice मधील Shylock च्या पात्रामधूनही ही भावना प्रकट होते. २० व्या शतकात हीटलरने या भावनेला मूर्त स्वरुप दिले. ज्युविरोधी वातावरण तापवले, सत्ता प्राप्त केली आणि अधिकृतपणे मोठा नरसंहार घडवून आणला. याचा परिणाम म्हणून आर्थिक दृष्ट्या संपन्न, बौद्धिक दृष्ट्या प्रगत, उद्यमशील ज्यु जमात अमेरिकेत आश्रयाला गेली. तेथे त्यांचा प्रभावी दबावगट निर्माण झाला. त्यांच्या दबावामुळे अमेरिकेने त्यांना पॅलेस्टाईनच्या भूमीवर लष्करी ताकदीच्या आधारावर इस्त्रायल हे राष्ट्र स्थापन करण्यास मदत केली. अनेक मुस्लीम या प्रक्रियेत मारले गेले – त्यातूच इस्लामिक दहशतवादाचा जन्म झाला. अरबी टोळ्यांमध्ये असलेले विशिष्ठ वातावरण दहशतवादी पद्धतीने कार्य करण्यास पोषक होते. नष्ट होण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याजवळ नव्हता – इस्त्रायल आणि अमेरिका हे ब्रिटन सारखे soft state नाहीत. खुद्द अमेरिकेच्या इतिहासातही रेड इंडीयन्सचा प्रचंड आणि अमानुष पद्धतीने केलेला नरसंहार आहेच.
यासर अराफत यांच्या नेतृत्वाखाली PLO ची (Palestine Liberation organization) स्थापना झाली. १९९३ पर्यंत या संघटनेने उघडपणे दहशतवादाचा पुरस्कार केला. PLO मधून फुटून काही गट स्थापन झाले. हेजबुल्ला (शिया) हमास हे गट अस्तित्वात आले.
या सगळ्या वातावरणात खतपाणी घालण्याचा प्रकार अमेरिका आणि रशिया मधील शीतयुद्धाने झाला. संपूर्ण जगावर नियंत्रण मिळविण्याच्या खटाटोपात दोन्ही राष्ट्रांनी अनेक दहशतवादी गटांना जाणिवपूर्वक प्रोत्साहन दिले. अमेरिकेतील (Military industrial complex) खाजगी क्षेत्रातील शस्त्रास्त्र निर्मीती करणा-या उद्योगांचे हीतसंबंध यामध्ये गुंतले होते. जेवढे संघर्ष अधिक तेवढा शस्त्रास्त्रांचा खप आणि म्हणून मागणीत वाढ. पण जेवढा शस्त्रास्त्रांचा शप अधिक तेवढी प्रणहानी जास्त हा माणुसकीचा विचार सोयिस्कर रीत्या विसरला जातो. याच MIC केनडीची हत्या घडवून आणल्याचा आरोप केला जातो. JFK या अलिकडच्या सिनेमामधुनही ही सिद्धांत मांडला आहे. Noam Chomsky हा अमेरिकन विचारवंत America is a leading terrorist state in the world असे विनाकारण म्हणत नाही. America : Freedom to Fascism या वेबसाईटवर अमेरिकेच्या दहशतवादी आणि हिंसक कृत्यांवर प्रकाश टाकला आहे.
दहशतवादाचा आसरा घेऊन अमेरिकन सरकार अनेरिकन नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आणि नागरी स्वातंत्र्यावर बंधने आणु पाहत आहे असा आरोप करण्यात येतो. मे २००८ पर्यंत प्रत्येक अमेरिकन नागरिकाला आपल्या कातडीखाली RFID चीप बसवून घ्यावी लागेल – तसा कार्यक्रम सरकारने जाहीर केला आहे.
मध्य पूर्वेतील दहशतवादाला प्रोत्सहन देण्यामागे अमेरिकेचे तेलासंबंधीचे हीतसंबंध गुंतलेले आहेत ही बाब उघड आहे.
या आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा परिणाम भारतात काश्मीरमध्ये सर्वाधिक जाणवतो. काश्मीरला अर्थातच भारत-पाकिस्तान संबंधांची आणि हिंदु-मुस्लीम संघर्षाची पार्श्वभूमी आहे. शिवय काशमीरी संस्कृती आणि जिवनपद्धतीच्या वेगळेपणाची पार्श्वभूमी आहेच.
पंजाबमधील दहशतवाद थोड्या वेगळ्या स्वरुपाचा आहे. त्याची सुरवात इथल्या विशिष्ठ राजकीय परिस्थितीतून झाली. १९७८-७९ मध्ये कॉंग्रेस पक्षाने अकाली राजकारणाला शह देण्यासाठी भिंद्रनवाले नावाच्या छोट्या गावातील किरकोळ परंतु भडक आणि आगपाखड करणारी भाषा वापरणा-या गुरुद्वारातील ग्रंथीला हाताशी धरले. अल्पावधीतच तो मोठा झाला, कॉंग्रेसच्या नियंत्रणाबाहेर गेला आणि स्वतंत्र खलिस्तान साठीची दहशतवादी चळवळ त्याने सुरु केली. नंतरच्या टप्प्यावर त्यांना पाकिस्तान आणि अमेरिकेतून मदत मिळाली – आजही थोड्या प्रमाणात हा विचार अस्तित्वात आहे.
काश्मीर आणि पंजाबमंतर नक्षलवाद्यांचा विचार करावा लागतो – यांनी बिहार, झारखंड, ओरीसा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक या राज्यात ब-यापैकी हातपाय पसरले आहेत. (Red corridor) त्यांचा मुद्दा मुख्यतः आर्थिक शोषणाचा आणि जमिनीच्या फेरवाटपाचा आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही – बंदुकीच्या नळीतूनच सत्तेचा मार्ग जातो या माओच्या विचारावर त्यांचा ठाम विश्वास आहे. परंतु ब-याच ठिकाणी मूळ उद्दीष्टांपासून बाजूला जावून या चळवळीने स्थानिक आदिवासिंना आणि दुर्बल घटकांना वेठीस धरल्याचे चित्र दिसते. ज्या भागात त्यांचा प्रभाव अधिक आहे तेथे भारतीय घटना लागू करता येत नाही, प्रशासनाला कोणतेही कार्य करता येत नाही अशी परिस्थिती आहे. पोलीसांना कॉलसाईनचा वापर केल्याशिवाय एकमेकांशी संवाद करता येत नाही. पोलीसांमध्ये नक्षलवाद्यांचा ब-यापैकी शिरकाव झालेला आहे. (infiltration).
इशान्येकडील राज्यांमध्ये वेगळे प्रश्न आहेत. तेथे प्रत्येक राज्यात स्वतंत्र दहशतवादी संघटना कार्यरत आहेत उदा. Gorkha national liberation front – Darjeeling, Manipur People’s Party – Manipur, Naga Socialist Council – Nagaland, Mizo National Front – Mizoram, Tripura National Volunteers – Tripura, Bodo Mukti morcha – Assam.
[१] काही महत्वाच्या दहशतवादी संघटना पुढीलप्रमाणे –
1. Abu Nidal organization
2. Al Qaeda
3. Aum Shinrikyo
4. Black September
5. Hamas
6. Harkat ul-Ansar
7. Hizbollah
8. Irish Republican Army
9. Islamic Jihad
10. Khmer Rouge
11. Ku Klux Klan
12. Kurdistan worker’s party
13. LTTE
14. Mujahadin
15. Palestine Liberation Organisation
16. Kal Khalsa
17. Kamdami tanksal
18. Neo Nazis
19. Talibaan
20. Naxalites
21. ETA – Basque Nation and Liberty (Spain and France)