Virendra Valsangkar

virendra rashtriya puraskar

Virendra Valsangkar

Director of the National Award Winning Film

“Vishnupant Damle : The Unsung Hero of Talkies”

(Click above link to see trailer on YouTube)

 

College Function Poster

“विष्णुपंत दामले – बोलपटांचा मूकनायक”

मी शाळेत होतो तेव्हाची म्हणजे १९८० ते १९८५ च्या दरम्यानची गोष्ट. पाचवी ते दहावी ची वर्षे. त्या वयात पिक्चरशी केवळ एक भावनिक नाते असते. पिक्चर मधील स्टंट, प्रेक्षणीय स्थळे, स्टोरी, नट नट्या इथपर्यंतच पिक्चरचे आकलन मर्यादित. अधिक लक्ष पॉपकॉर्न आणि वडे यांच्यावरच. पिक्चरचे समीक्षण, टीकात्मक परिक्षण वगैरे डोक्याच्या पलिकडच्या गोष्टी.

पण त्या वयातही माझ्या एका मित्राचा दृष्टीकोन वेगळा होता. त्याने एकदा श्याम बेनेगल यांचा चित्रपट पाहिला. त्याला त्या सिनेमाबद्दल त्याच्या कथानकाबद्दल, दिग्दर्शनाबद्दल त्याला काही प्रश्न पडले. त्याने बेनेगल यांचा पत्ता मिळवून त्यांना पत्र लिहीले. काही दिवसांनी बेनेगलांनी पत्रास सविस्तर उत्तर पाठवले. त्याच्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली. त्या पत्रलेखक मित्राचे नाव विरेंद्र वळसंगकर. शाळेत असल्यापासून त्याला सिनेमाचे, दिग्दर्शनाचे प्रचंड आकर्षण. सिनेमा क्षेत्रात काम करणे हे त्याचे स्वप्न. खडतर परिश्रमांनंतर त्याने आपले उद्दीष्ट साध्य केले.

त्याला वाचनाचीही खूप आवड होती. वाचलेली गोष्ट जशीच्या तशी सांगता येणे हे त्याचे आणखीन एक वैशिष्ट्य. शाळेत मधल्या सुट्टीत तो गोष्टी सांगायचा. टारझन, पॅपिलॉन, जेम्स बाँड, शेरलॉक होम्स या सर्व कथा मी त्याच्याकडूनच ऐकल्या. बऱ्याच इंग्रजी चित्रपटांचा परिचय त्याच्याशी बोलतानाच झाला. पाश्चात्य पॉप संगीतामध्येही त्याला खूप रूची आहे. ब्रायन अॅडम्सचे “Please forgive me…” त्याच्याकडेच ऐकल्याचे आठवते

Virendra Valsangkar
Virendra Valsangkar

मी अभ्यासासाठी नेहमी त्याच्या घरी जायचो – विशेषतः परिक्षा जवळ आली की दोन तीन दिवस तरी माझा त्याच्याकडेच मुक्काम असायचा. त्यांच्या घरात एक वेगळेच वातावरण मी अनुभवले. एका खोलीत भींतीवर जगाचा नकाशा टांगलेला होता. नॅशनल जिओग्राफिक चे अंक पहायला मिळत. आज आपण गुगल मॅप्सचा वापर करून प्रवास करतो. कॉलेज मधे असताना छापील मॅपवर व्यवस्थित नियोजन करून भारताच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीची मोटरसायकलवरून सफर विरेंद्र त्याचे काका आणि काही आते मामे भावंडे या सर्वांनी मिळून यशस्वी रीतीने पार पाडल्याचे मला आठवते. आजोबा कै.विष्णुपंत गुंडोपंत तथा गुरुराव वळसंगकर प्रतिथयश आणि नामवंत वकील. वडील एस. टी. मध्ये इंजिनियर, एक काका सीए – सतत काहीतरी अॅक्टीवीटी घरात चालू असायची. ब्रिटीश काळात बंदी घालण्यात आलेल्या सावारकरांच्या “१८५७ चे स्वातंत्र्य समर” या पुस्तकाची प्रत मी त्यांच्या घरीच पहिल्यांदा पाहिली.

शाळेनंतर आमचे मार्ग वेगळे झाले. तो सिव्हील इंजिनियर झाला. नोकरी लागली. पण मन त्यात रमत नव्हते. एक दिवशी बंडखोरी करून सर्व सोडून तो पुण्याला निघून गेला. तिथे सुमित्रा भावे यांच्या बरोबर काम करीत स्वतःची प्रगती करून घेतली. त्याने दिग्दर्शित केलेल्या विष्णुपंत दामले यांच्या वरील चित्रपटाला (डॉक्युड्रामा) नॅशनल फिल्म अॅवॉर्ड मिळाले. स्लोव्हाकिया येथे झालेल्या फिल्म फेस्टीवल मध्ये त्याच्या आणखी एका माहितीपटाला पारितोषिक मिळाले. त्याच्याबद्दलचे नेटवर उपलब्ध असलेले काही संदर्भ त्याची आणखी चांगली ओळख करून देतील :-

Some extracts from his personal website :-

Virendra Valsangkar : A graduated civil engineer trained himself in filmmaking by working
with director duo Sumitra Bhave and Sunil Sukthankar in early years.

Received National Award for ‘Vishnupant Damle : The Unsung Hero of Talkies’ as ‘best
biographical / historical reconstruction’ film in 2012.

As a director he directed

 1. a short fiction ‘Sometimes’,
 2. a suspense thriller TV program ‘Olakh’ for a Marathi channel and
 3. certain documentaries on various subjects, including
  1. ‘Forts of Maharashtra’,
  2. ‘Maharashtra:the place’, ‘The Unfolding White’,
  3. series of documentaries about the ‘Tribes of Maharashtra’ and
  4. few documentaries for educational and social institutions.

Also worked as an editor for

 1. the National award winning Marathi feature film ‘Devrai’(The sacred Grove) and
 2. ‘Ha Bharat Maza’( India is my country).

Received ‘International Jury Award’ for the documentary ‘The Unfolding White’ in Ekotop film festival, Slovakia

References:-

Personal Website

A page on Culture Unplugged

Facebook page

Indian Express Article Feb. 5, 2014

National Film Awards list

A shortfilm on Shirish Beri

 

 

int film fest goa